मुंबई - राजधानीत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील नागरिकांचे हाल पाहायला मिळाले. गेले तीन दिवस पाऊस सुरू असून मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने मुंबईची पुन्हा तुंबई झाली आहे. या चार दिवसात सरासरी 399.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या अकरा वर्षात सप्टेंबर महिन्यात पडलेला हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
मुंबईतीत चार दिवसातील पावसाने सप्टेंबर महिन्यातील अकरा वर्षांचा रेकॉर्ड मोडला हेही वाचा - मुंबई : पावसात अडकलेल्यांना सिद्धिविनायक मंदिरात निवारा, मंदिर प्रशासनाचा निर्णय
2008 ते 2018 या 11 वर्षातील सप्टेंबर महिन्यात सरासरी 341 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मुंबईत सध्या पाऊस सुरू असून 1 ते 4 सप्टेंबर या चार दिवसात 399.4 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसात पडलेल्या पावसाने गेल्या 11 वर्षांची संपूर्ण सप्टेंबर महिन्याची सरासरी ओलांडली आहे.
कुलाबा वेधशाळेमार्फत पुढील 24 तासांकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरी पडत राहतील. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा - मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; १३०० नागरिकांना हलवले सुरक्षित स्थळी
पावसाची नोंद (मिलीमिटरमध्ये) -
3 सप्टेंबरला रात्री 10 वाजल्यापासून आज (4 सप्टेंबर) सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वाधिक वडाळा अग्निशमन केंद्र 261.57, इमारत प्रस्ताव कार्यालय विक्रोळी (पश्चिम) 289.31, बोरिवली अग्निशमन केंद्र 312.68, दादर अग्निशमन केंद्र 256.81, विक्रोळी अग्निशमन केंद्र 251.94, प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर 295.63, धारावी अग्निशमन केंद्र, 244.56, मुलुंड अग्निशमन केंद्र 227.05, कांदिवली अग्निशमन केंद्र 286.47, एफ/उत्तर विभाग 239.47, चेंबूर अग्निशमन केंद्र 227.26, के/पूर्व विभाग 281.14, वरळी फायर स्टेशन 230.61, कुर्ला अग्निशमन केंद्र 226.52, के/ पश्चिम विभाग 270, एसडब्ल्यूडी कार्यशाळा दादर 230.13, एस विभाग 217.93, मरोल अग्निशमन केंद्र 254.98, रावली कॅम्प 224.55, गवानपाडा अग्निशमन केंद्र 217.42, विलेपार्ले अग्निशमन केंद्र 250.17, एल विभाग 211.25, अंधेरी अग्निशमन केंद्र 240.54, एम/पश्चिम विभाग 203.39, दिंडोशी अग्निशमन केंद्र 231.87, एम/पूर्व विभाग 201.69, एचबीटी ट्रॉमा हॉस्पिटल 229.37, एन विभाग 201.64, बीकेसी 227.00, भांडुप कॉम्प्लेक्स 193.04, एसडब्ल्यूएम सांताक्रूझ कार्यशाळा,223.76, वांद्रे अग्निशमन केंद्र, 221.74, चिंचोली अग्निशमन केंद्र, 215.11, मालाड अग्निशमन केंद्र 211.80, वर्सोवा पंपिंग स्टेशन 211.31, मालवणी अग्निशमन केंद्र 203.92, गोरेगाव 203.92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा - ठाण्यात पावसाचे थैमान; रेल्वेसह जनजीवन विस्कळीत