महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साहेब निर्णयाचा पुनर्विचार करा, रोहित पवारांचे भावनिक आवाहन - रोहित पवार

पवारांनी लोकसभा निवडणूकीतून माघार घेतली म्हणून त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आल्या आहेत. यावेळी रोहित यांनी या सर्वांना चांगलेच धारेवर धरले. शरद पवारांबद्दल वक्तव्ये करताना त्यांच्याबाबतचे मत शेवटचे असू द्या अन्यथा तुमची बेडकासारखी अवस्था होईल असा टोलाही त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला.

रोहित पवार

By

Published : Mar 12, 2019, 8:51 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. या नंतर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिय उमटत आहे. मात्र, त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे मत माझ्यासह आपल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आहे, अशी भावनिक फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी आज केली.

पवारांनी लोकसभा निवडणूकीतून माघार घेतली म्हणून त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आल्या आहेत. यावेळी रोहित यांनी या सर्वांना चांगलेच धारेवर धरले. शरद पवारांबद्दल वक्तव्ये करताना त्यांच्याबाबतचे मत शेवटचे असू द्या अन्यथा तुमची बेडकासारखी अवस्था होईल असा टोलाही त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला.

त्यांनी या फेसबुक पोस्टमधून पवरांना भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, पवार साहेब कार्यकर्त्यांच्या मताला नेहमीच महत्त्व देतात. त्यामुळेच ते गेली ५० वर्ष यशस्वी राजकारण करत आहेत. त्याबरोबरच समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते असे सर्वसामान्य माणसांचे मत आहे. त्यामुळेच मी एक कार्यकर्ता म्हणून, “साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा.”

त्याबरोबरच त्यांच्या निर्णयाची टीका करणाऱ्यांना ते म्हणाले, बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details