महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंडखोरांच्या रडारवर शिवसेना.. साबणेंनी मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' प्रश्नावर बाळासाहेबांच्या अटकेची करून दिली आठवण - mla Subhash Sabane news

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या रडारवर आता मुख्यमंत्री ( Mla Subhash Sabane on balasaheb thackeray arrest ) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत. आज आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची आठवण करून देत थेट ( Mla Subhash Sabane news ) मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

mla Subhash Sabane on balasaheb thackeray arrest
बाळासाहेब ठाकरे अटक आठवण सुभाष साबणे

By

Published : Jun 27, 2022, 11:52 AM IST

Updated : Jun 27, 2022, 12:00 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या रडारवर आता मुख्यमंत्री ( Mla Subhash Sabane on balasaheb thackeray arrest ) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत. आज आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची आठवण करून देत थेट ( Mla Subhash Sabane news ) मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. शिवसेनेविरोधात आता बंडखोर आमदारही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

माहिती देताना सुभाष साबणे

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे नेमकं कोण आहेत? वाचा कारकीर्द

मुख्यमंत्र्यांनी किरीट सोमैया यांच्यावर जोरदार टीका केली होती. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमैया यांच्या मांडीला मांडी लावून बसू का? असा प्रश्न मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधन करताना उपस्थित केला होता. बंडखोर आमदार सुभाष साबणे यांनी आता थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. शिवसेनाप्रमुखांना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का? असा सवाल भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केल्यावर विधानसभेत या विरोधात जाब विचारल्याबद्दल वर्षभर निलंबन झेललेले माजी शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी करून आधी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात अनिल देशमुख यांच्या मेव्हण्याला उमेदवारी देऊन त्यांचा पराभव करण्यात आला. पंढरपूरची पोटनिवडणूक लागली त्यातही शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात अली, देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तेच करण्यात आले. आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीत राजेश क्षीरसागर यांच्यासारखा कार्यकर्ता असतानाही ती जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याचे बंडखोर आमदार साबणे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांचे हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे. त्यामुळे, सर्वसामान्य शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला जाहीर समर्थन द्यावे, अशी मागणी साबणे यांनी केली.

हेही वाचा -Eknath Shinde called Raj Thackeray : एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना केला फोन, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा

Last Updated : Jun 27, 2022, 12:00 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details