महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंडखोर नेते एकनाथ शिंदे स्वतंत्र गट स्थापन करणार? 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा - एकनाथ शिंदे लाईव्ह अपडेट

एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गटासाठी 37 संख्या हवी आहे. परंतु, 40 आमदार असल्याचा दावा शिंदे ( 40 MLAs support Eknath Shinde ) करत आहेत. नुकताच शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल ( MLAs photo in Surat viral ) झाला आहे.

बंडखोर आमदार
बंडखोर आमदार

By

Published : Jun 22, 2022, 8:05 AM IST

Updated : Jun 22, 2022, 8:58 AM IST

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन ( rebel leader Eknath Shinde ) करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक पत्र तयार केले आहे. बंडखोर आमदारांच्या स्वाक्षरी त्यावर घेण्यात ( Eknath Shinde live update ) आल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात आणि सुरतमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गटासाठी 37 संख्या हवी आहे. परंतु, 40 आमदार असल्याचा दावा शिंदे ( 40 MLAs support Eknath Shinde ) करत आहेत. नुकताच शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल ( MLAs photo in Surat viral ) झाला आहे. व्हिडिओत आमदार निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आवश्यक मतांचा कोटा शिंदे यांनी पूर्ण केल्यास स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र राजभवनला लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे.



भाजप सतर्क - एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमध्ये गेल्यानंतर भाजपच्या मनेत्यांनी थेट गुजरात गाठले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली. राजकीय घडामोडींना यामुळे आता वेग आला आहे. सध्या भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्यात मोठी उलथापालथ होईल, अशी चर्चा रंगली आहे

रात्री आमदार सुरतहून गुवाहाटीला हलविले-विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना आणि अपक्ष असे मिळून 35 हून अधिक आमदार सोमवारी रात्री सुरतला पोहोचले होते. बुधवारी रात्री सुरत विमानतळावरून ते सर्व गुवाहाटीकडे रवाना झाले. सकाळी ६ च्या सुमारास हे सर्व आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे पोहोचले ( Eknath Shinde arrives in Guwahati ) आहेत.महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारच्या अडचणी वाढल्या असून, राजकीय उलथापालथीचे केंद्र गुजरातमधील सुरत शहर बनले होते. बंडखोरी करत शिवसेनेचे आमदार सुरतमध्ये आले. महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरातमधील सुरत शहरातील ले मेरिडियन हॉटेलमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकार हादरले, एवढेच नाही तर आपल्या नाराज आमदारांचे मन वळवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर जबाबदारी टाकली होती. सलग 2 तास प्रयत्न करूनही आपल्या पक्षाच्या आमदारांचे मन वळवण्यात त्यांना अपयश आले.

Last Updated : Jun 22, 2022, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details