महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माणूस झाला घरात बंद; प्राणी करतायेत मुक्त संचार!

कोरोनाच्या भीतीने आता रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. प्रदूषण कमी झाले आहे. मानवाने प्राण्यांच्या ज्या अधिवासावर अतिक्रमण केले, त्याच अधिवासात प्राणी पुन्हा येत आहेत. यावर विक्रोळीतील चित्रकार दर्शना गोवेकर यांनी एक वास्तवदर्शी काढले आहे.

Corona Drawing
कोरोना चित्रण

By

Published : Apr 9, 2020, 9:03 AM IST

मुंबई - कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घरात बसून तर, प्राणी-पक्षी रस्त्यावर मुक्तपणे वावरत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. यावर विक्रोळीतील चित्रकार दर्शना गोवेकर यांनी एक वास्तवदर्शी काढले आहे.

चित्रकार दर्शना गोवेकर यांनी काढलेले चित्र

एक कुटुंब अभयारण्य फिरायला जाते आणि तेथील प्राणी त्यांना दिसतात. नंतर कोरोनामुळे त्याच कुटुंबाने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे आणि घरातून ते रस्त्यावर पाहत आहेत. त्यावेळी त्यांना अभयारण्यातील प्राणी रस्त्यावर दिसतात. हे प्राणी त्या कुटुंबाला प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसारखे पाहत आहेत, असा देखावा असलेले चित्र दर्शना यांनी काढले आहे.

कोरोना मानवनिर्मित असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या भीतीने आता रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. प्रदूषण कमी झाले आहे. मानवाने प्राण्यांच्या ज्या अधिवासावर अतिक्रमण केले, त्याच अधिवासात प्राणी पुन्हा येत आहेत. पर्यावरणाचा समतोलही राखला जात आहे, यावरून कल्पना करून हे चित्र काढल्याचे दर्शना यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details