मुंबई:2 वर्ष कोरोनाच्या सावटमध्ये गेल्यानंतर उत्साहात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वच सज्ज झाले आहेत. दिवाळीसाठी सर्वच बाजारपेठा देखील फुलले आहेत. Readymade Faral कंदील, फटाके, मिठाई तसेच नवनवीन कपड्यांची दुकाने लोकांनी भरलेली पाहायला मिळतात. मात्र यासोबतच घरगुती फराळ घेण्यासाठी देखील लोकांनी गर्दी केलेली दिसत आहे. दिवाळीत खास करून फटाके, कंदील, नवीन कपडे, रांगोळी पण यासोबतच इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होताना आपण अनेक वर्ष पाहिली आहे. मात्र ही खरेदी करत असताना हिंदू संस्कृतीप्रमाणे सर्वांच्याच घरी घरगुती दिवाळी फराळ तयार केला जायचा. मात्र आता दिवाळी फराळही रेडीमेड घेण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचा दिसत आहे.
दरवर्षी रेडिमेट फराळाची मागणी वाढतेदिवाळीचा फराळ जवळ जवळ प्रत्येक घरात तयार केला जातो. मात्र गेल्या काही वर्षापासून दिवाळी फराळ हा देखील रेडिमेट आणण्याकडे कल वाढताना पाहायला मिळतोय. खास करून ज्या महिला बचत गट आहेत, किंवा जिथे घरगुती फराळ बनवून मिळतो. अशा ठिकाणी रेडीमेड फराळाला जास्त मागणी आहे. तसेच या फराळाच्या मागणीत दरवर्षी १५ ते २० टक्के वाढत होत. मुंबईतील लालबाग परळ, गिरगाव शिवडी या मराठमोळ्या वस्त्यांमध्ये अधिक तर घरगुती रेडिमेड फराळाला अधिक मागणी आहे. खास करून लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळी, अनारसे अशा घरगुती फराळांना लोक पसंती देत आहेत.