मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे याही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत,संत नामदेवांच्या घुमान रथयात्रेचा फडणविसांच्या हस्ते प्रारंभ, दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब झाली आहे, उत्तर कोरिया क्षेपणास्त्रे वापरत असून संपूर्ण जगाला धोका निर्माण होण्याची चिंता भारताने संयुक्त राष्ट्रात व्यक्त केलीया घटना दिवसभरात महत्त्वाच्या असणार आहेत.
नंदा म्हात्रे भारत जोडो यात्रेत सहभागी :रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे याही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार ( Nanda Mhatre participate Bharat Jodo Yatra ) आहेत. या पदयात्रेतून भारत समजून घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कन्याकुमारी पासून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चार राज्यांचा प्रवास करत तेलंगणात पोहोचली आहे. पेण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापुर्वी निवडणूक लढवली आहे. कन्याकुमारीहून निघालेली ही यात्रा सध्या चार राज्यांचा दौरा करून तेलंगणात दाखल झाली आहे. यात्रेचा हा अनुभव समृद्ध करणार आहे. भारत समजून घेण्याची संधी यामुळे मिळत आहे. दररोज नवनवीन लोक भेटत आहेत. त्यांचे प्रश्न मांडत आहेत. त्यांचे प्रेम आणि पाठिंबा व्यक्त करत आहेत. हे खूप भारावून टाकणारे असल्याचे नंदा म्हात्रे सांगतात.
संत नामदेवांच्या घुमान रथयात्रेचा फडणविसांच्या हस्ते प्रारंभ :संत नामदेवांच्या घुमान रथयात्रेचा फडणविसांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.संत नामदेव महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी प्रांत, भाषांची बंधने बाजूला ठेवून, पायी चालत संपूर्ण हिंदूस्थानात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला (Saint Namdev Mahataj Rath Yatra started by Fadnavis) होता. पंजाबमध्ये शीख धर्मात संत नामदेव महाराजांचे स्थान अढळ राहिले आहे. त्यांनी केलेल्या भागवत धर्माच्या प्रसाराला उजाळा देत पंढरपुरातून पंजाबमध्ये घुमानपर्यंत काढण्यात येणाऱ्या रथ व सायकल यात्रेतून पंढरपूर आणि घुमानचे नाते पुन्हा एकदा उजळून निघणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.