मुंबई -महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची सरबत्ती लावली होती. मात्र, आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका (allegations between bjp and mahavikas aghadi ) ड्रग्ज माफियाशी असलेला संबंधापासून, दंगलीशी असलेल्या संबंधापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते आहे.
एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप -
28 नोव्हेंबर 2019 या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. या दिवशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav thackrey) यांनी शपथ घेतली. आघाडी सरकार आता जवळपास दोन वर्ष पूर्ण करत असताना हा पूर्ण कार्यकाळ पाहिला असता राज्यामधील विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (mahavikas aghadi) असलेले शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांमध्ये वेळोवेळी एकमेकांवर गंभीर आरोप केलेले पहिला मिळतात. अगदी या दोन वर्षांमध्ये दोन्ही बाजूने भ्रष्टाचारावरून सुरू झालेल्या आरोपांची मालिका आता ड्रग्ज (Drug) आणि माफिया संबंधांपर्यंत येऊन पोहोचली आहे. तर राज्यात सत्ताधारी दंगलखोरांना पाठिंबा देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे सत्ता नसल्याने अस्वस्थ झालेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यांमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतो. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपा पासून सुरू झालेली ही मालिका आता दंगल घडवण्याच्या आरोपापर्यंत येऊन पोहोचली आहे असंच म्हणावं लागेल.
अनेक नेत्यांवर तपास यंत्रणेचा ससेमिरा -
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारमधील नेते तसेच मंत्री यांच्यावर विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने एकापाठोपाठ एक भ्रष्टाचार असलेल्या आरोप केले होते. खास करून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर आरोपांची झोड उठवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab), खासदार भावना गवळी (Bhavna Gawali), मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) , मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यापैकी अनिल देशमुख प्रताप सरनाईक भावना गवळी यासारख्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरादेखील सुरू झाला आहे. त्यात आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या कार्यकारिणी बैठकीत आमदार आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर असलेल्या आरोपांची मालिका वाचून दाखवली.
- हेही वाचा - राज्य सरकार गुन्हेगार व दहशतवाद्यांचे समर्थक.. ठाकरे सरकारकडून हिंदू धर्म व महाराष्ट्र धर्मावर घाला - आशिष शेलार
- हेही वाचा - Video : आपले सरकार येण्याची चिंता सोडून जनतेसाठी रस्त्यावर उतरा; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना संदेश
महाविकास आघाडी सरकारचा पलटवार -
भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने होणारे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोपांंची मालिका थांबत नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनीदेखील भाजपाच्या आरोपांना तेवढ्याच प्रखरतेने उत्तर द्यायला हवा. असा सल्ला पत्रकार परिषदेतून मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाला तेवढ्याच प्रखरतेने उत्तर देण्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सुरू केली. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या आरोपांच्या मालिकेनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचे होते. सूडबुद्धीने आरोप करणे चुकीचे असून शेराला सव्वाशेर मिळतोच. केवळ सरकारला पाडण्यासाठी किंवा सरकार अस्थीर करण्यासाठी भाजपकडून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.