मुंबई:पत्राचाळ कथित गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. शिवसैनिकांनी यानंतर एकच जल्लोष करण्यात येत आहे. राजकीय स्तरावरुन ही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच 'दोस्ती का दम.... दिखा देंगे अब हम' अशी प्रतिक्रिया देत, भावना व्यक्त केल्या आहेत.
Sanjay Raut granted bail: पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर; पहा कोण काय म्हणाले - संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर
15:37 November 09
Sanjay Raut granted bail: दोस्ती का दम.... दिखा देंगे अब हम...;संजय राऊत यांना जामीन मिळताच जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
15:18 November 09
Sanjay Raut granted bail: न्यायप्रक्रियेवर आमचा विश्वास, संजय राऊत यांना जामीना मिळतात सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
मुंबई:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करतात. शिवसेनेकडून न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आलंच यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत न्याय प्रक्रियेवर आमचा विश्वास होता. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे लढवय्ये नेते आहेत. फक्त महाराष्ट्र नाही, तर लढवय्ये नेते म्हणून संजय राऊत आहेत. एखाद्या नेत्यावर असे प्रसंग आले असते. त्यांच्या कुटुंबावर नेमकी काय परिस्थिती ओढवते. हे आपण छगन भुजबळ यांच्यापासून पाहत आलो आहे. नाही प्रक्रियेवर आमचा विश्वास आहेच. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याबद्दल न्यायपालिकेचे देखील धन्यवाद सुप्रिया सुळे यांनी मुंबई प्रसारमाध्यमांची संवाद साधताना मानले आहेत.
सर्व नेते लवकरच बाहेर येतीलसंजय राऊत यांच्यासह नवाब मलिक अनिल देशमुख यांना देखील अटक झाली आहे. मात्र ज्याप्रमाणे संजय राऊत यांना आज जामीन मिळाला त्याचप्रमाणे इतर नेत्यांनाही लवकर जामीन मिळेल. आणि हे दोन्हीही नेते लवकरात लवकर सुटतील, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. या संघर्षाच्या काळात लेखी सुना ठामपणे कुटुंबाच्या मागे उभे आहेत. ही कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांचाही आपल्याला अभिमान असल्यास यावेळी सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.
14:45 November 09
Sanjay Raut granted bail: पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर; पहा कोण काय म्हणाले
मुंबई: पत्राचाळ कथित गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. शिवसैनिकांनी यानंतर एकच जल्लोष करण्यात येत आहे. राजकीय स्तरावरुन ही प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच 'टायगर इज बॅक' अशी प्रतिक्रिया देत, भावना व्यक्त केल्या आहेत.
संजय राऊत यांना पत्रावाला चाळ प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. कुटुंबियांव्यतिरिक्त त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्या वतीने जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्जही करण्यात आले आहे. मात्र, त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. आज न्यायालयाने 2 लाखाच्या जात मुचल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातून आनंद व्यक्त केला जात आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत टायगर ईज बॅक अशी प्रतिक्रिया दिली आहे.