महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MVA Mahamorcha Live : महाविकास आघाडीचा महामोर्चा ; वाचा प्रतिक्रिया - महाविकास आघाडीचा महामोर्चा प्रतिक्रिया

Reaction to the MahaMarch
महामोर्चावर प्रतिक्रिया

By

Published : Dec 17, 2022, 7:41 AM IST

Updated : Dec 17, 2022, 12:59 PM IST

12:39 December 17

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांविरोधात शिर्डीत आंदोलन

अहमदनगर :पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांविरोधात शिर्डीत आंदोलन झाले. नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. फोटोला पायाखाली तुडवत दहन केले. यावेळी मोदी जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन केले गेले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांचा निषेध केला. हे आंदोलन शिर्डी नगरपालिकेसमोर करण्यात आले.

12:37 December 17

भाजपाकडून अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन

अमरावती :पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री याच्या विरोधात भाजपकडून जोरदार तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या पोस्टरवर जोडे-चपला मारून निषेध केला. पाकिस्तानचे पोस्टर आणि झेंडा जाळून पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या.

12:35 December 17

बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शिवाजी चौकात भारतीय जनता पार्टीचे आंदोलन झाले. बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा कोल्हापुरात भाजपकडून निषेध केला गेला. बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

09:30 December 17

आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका

मुंबई :आनंद दिघे यांचा कल्याणच्या उद्धव ठाकरे गटाला विसर पडला ? असा प्रश्न विचारला जात आहे. कल्याणमधील शिवसेनेच्या बॅनरवर स्व.आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने चर्चा होऊ लागली आहे. आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका होत आहे. शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी ठाकरे गटावर टीका केली.

08:51 December 17

हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिल्यानंतर ठाण्यातील परिवहन सेवा आज बंद

मुंबई : आज सकाळपासून एकही बस रस्त्यावरून धावली नाही. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात ठाणे बंद पुकारला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर अचानक परिवहन सेवेने बंद केल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचा पाठिंबा आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिल्यानंतर ठाण्यातील परिवहन सेवा आज बंद आहे.

06:38 December 17

हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिल्यानंतर ठाण्यातील परिवहन सेवा आज बंद

मुंबई : आज महाविकास आघाडीचा महामोर्चा आहे. हा मोर्चा आज सकाळी ९ वाजजा सुरू होत आहे. दरम्यान, मोर्चा सुरू होण्यापुर्वीच विरोध सुरू झाला आहे. भायखळा आणि नागपाडा परिसरात सुषमा अंधारे यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मराठा युवा सेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. याध्ये सुषमा अंधारे यांची जुने वक्तव्य बॅनर्सवर लिहिली आहेत.

Last Updated : Dec 17, 2022, 12:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details