महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Controversial Statement : राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari controversial statement ) यांनी केलेल्या वक्तव्यविरोधात राज्यभर निषेध आंदोलन केली जात आहेत. राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी देखील विविध स्तरातून करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर ( Chandrakant patil controversial statement ) संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 12, 2022, 3:45 PM IST

Updated : Dec 20, 2022, 6:35 PM IST

मुंंबई:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान ( Bhagatsingh Koshyari controversial statement ) केल्याप्रकरणी अजूनही निषेध व्यक्त केला जात आहे. तर विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान ( Chandrakant patil controversial statement ) केल्याप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.

शाई फेकल्याने काही होतं का? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी तीन जणांवर इतर कलमासह 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न हे कलम लावण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, शाई फेक करणारा फुले, शाहू आंबेडकरांचा पाईक आहे. कुणाच्या जीवाला धोका निर्माण होईल, असे वागू नये. नाशिकला साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली. शाई पुसून त्यांनी भाषण केले. शाई फेकणाऱ्याला पकडले, ते निघून गेले. चंद्रकांत पाटील यांच्यावर ज्यांनी शाई फेकली त्यांच्यावर 307 कलम लावले. खुनाचा प्रयत्न?, मला हे कळलंच नाही. चंद्रकांत पाटील हे धडधाकट आहेत. त्यांना शाई फेकल्याने काय होणार, मिश्किल टोला लगावला.

वाटेल ते बोलून लोकांना किती पेटवणार आहात

निलंबित अधिकाऱ्यांना रूजू करण्याची मागणी:पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अकरा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. हे निलंबन मागे घ्यावे यासाठी आता पोलिस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील पोलीस आयुक्तालयाच्या समोर महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेने आंदोलन करत घोषणाबाजी केली. निलंबित पोलिसांनी सेवेत रुजू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पिंपरी- चिंचवडमध्ये दौरा असताना शंभरपेक्षा अधिक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कडेकोट बंदोबस्त असताना तिघांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र भर उमटले. यामुळं घटनास्थळी उपस्थित असलेल्या अकरा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. तर, दोन वरिष्ठ पोलिसांच्या अंतर्गत बदली करण्यात आली आहे. शाईफेक प्रकरणी पोलिसांचा दोष नाही, ते निर्दोष आहेत. त्यामुळं त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे अध्यक्ष शबाब बाबूमिया शहा यांनी म्हटलं आहे.

वाटेल ते बोलून लोकांना किती पेटवणार आहात



गुन्हा दाखल करण्याची मागणी: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर भादंवि नुसार 307 चे कलम लावण्यात आले आहे. यावरे देखील विरोधकांनी टीका केली आहे. शाईफेक करणाऱ्यांवर 307 कलम लावणे याेग्य नाही. मंत्री चंद्रकांत पाटलांनी सामाजिक शांतता भंग करणारे वक्तव्य केले त्यांच्यावर 504 कलमा अंतर्गत पोलीस गुन्हा का दाखल करत नाहीत, असा सवाल कॉंग्रेस नेते राजू वाघमारे यांनी केला आहे. तसेच मंत्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. जो पर्यंत चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यत भाजपमध्ये वाचाळवीरांना लगाम लागणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी


राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी:काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याविरोधातील वाद अजूनही मिटलेला नाही. उद्धव ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी सांगितले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अजूनही त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी का मागत नाही. राज्यपालांनी गृहमंत्री अमित शहांचा सल्ला घेण्यापेक्षा आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा आणि जिथून तुम्ही आला आहात तेथे परत जा. तसेच महाराष्ट्रला नवीन राज्यपाल मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी

बीड शहर कडकडीत बंद:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा,कॉलेज महाविद्यालय, व्यापारी पेठा, दुकाने बंद ठेवून लोक सहभागी झाले होते. शिवप्रेमीं आणि सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने शहरातून निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. शहरांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी निवेंदन देवून मोर्चाची सांगता झाली. निषेध मुक मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने महिला तरूण, नागरिक सहभागी झाले होते. महापुरुषांच्या बाबतीत भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त व अपमानजनक वक्तव्य होत आहेत, याचा निषेध करत संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चेकरी काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

वाटेल ते बोलून लोकांना किती पेटवणार आहात; चंद्रकांत पाटलांना छगन भुजबळांचा सवालपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी तीन जणांवर इतर कलमासह 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न हे कलम लावण्यात आलं आहे. यारून विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांवर टोलेबाजी केली. चंद्रकांत पाटील हे धडधाकट आहेत, त्यांना शाई फेकल्याने काय होणार? शाईफेक प्रकरणी तिघांवर खुनाचा प्रयत्न हे कलम लावलं हे समजण्याच्या पलीकडे आहे. वाटेल ते बोलून आपण सुद्धा लोकांना किती पेटवणार आहात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले की, शाई फेक करणारा फुले, शाहू आंबेडकरांचा पाईक आहे. कुणाच्या जीवाला धोका निर्माण होईल अस वागू नये हे ठीक आहे. पण, वाटेल ते बोलून आपण सुद्धा लोकांना किती पेटवणार आहोत, शाई फेक प्रकरण अनेक वेळा झालं. नाशिक ला साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली. शाई पुसून त्यांनी भाषण केले. शाई फेकणाऱ्याला पकडलं, ते निघून गेले. चंद्रकांत पाटील यांच्यावर ज्यांनी शाई फेकली त्यांच्यावत 307 कलम लावलं. खुनाचा प्रयत्न?, मला हे कळलंच नाही. चंद्रकांत पाटील हे धडधाकट आहेत. त्यांना शाई फेकल्याने काय होणार, मिश्किल टोला लगावला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू यांच्या विरोधात बोलतील, तो आपला अशी भुमीका भाजपची दिसते आहे. त्यामुळं आपण ही त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. अस छगन भुजबळ म्हणाले.

बीड बंद

शाईफेक प्रकरणी निलंबित केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अकरा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच निलंबन केलं. हे निलंबन पाठीमागे घ्यावं यासाठी आता पोलिस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या समोर महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेने आंदोलन करत घोषणाबाजी केली. निलंबित पोलिसांनी सेवेत रुजू करावं अशी मागणी त्यांनी केले आहे. शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्यावर तीन जणांनी शाईफेक केली. या प्रकरणानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी अकरा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. चंद्रकांत पाटील यांचा पिंपरी- चिंचवडमध्ये दौरा असताना शंभर पेक्षा अधिक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कडेकोट बंदोबस्त असताना तिघांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र भर उमटले. यामुळं घटनास्थळी उपस्थित असलेल्या अकरा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. तर, दोन वरिष्ठ पोलिसांच्या अंतर्गत बदली करण्यात आली आहे.

या प्रकरणी आज पोलिस आयुक्तालयाच्या समोर महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेने पोलिसांच निलंबन मागे घ्यावं यासाठी आंदोलन केले. शाईफेक प्रकरणी पोलिसांचा दोष नाही, ते निर्दोष आहेत. त्यामुळं त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे अस आवाहन महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे अध्यक्ष शबाब बाबूमिया शहा यांनी म्हटलं आहे.

Last Updated : Dec 20, 2022, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details