महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले - pmc bank action

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीसीएम) सर्व व्यवहार रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने ६ महिन्यांसाठी गोठवले आहे.

पीएमसी बँक

By

Published : Sep 24, 2019, 12:10 PM IST

Updated : Sep 24, 2019, 3:11 PM IST

मुंबई- पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीसीएम) सर्व व्यवहार रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने ६ महिन्यांसाठी गोठवले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने आरबीआयने ही कारवाई केली. बँकींग नियामक कायद्याच्या कलम (३५ A) नुसार कारवाई करण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एमडी, जॉय थॉमस यांनी सांगितले.

रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. पीएमसीमध्ये आरबीआयला अनियमितता आढळून आली. ६ महिन्यांच्या आत सर्व अनियमितता दुर केली जाईल, त्यासाठी पाहिजे ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन थॉमस यांनी खातेधारकांना दिले. तसेच त्यांनी संचालक या नात्याने कारवाईची जबाबदारी स्विकारली आहे.

बँकेसाठी हा खूप कठीण काळ आहे. खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागेल, त्याबद्दल थॉमस यांनी खातेधारकांची क्षमा मागितली आहे. या परिस्थितीतवर आपण नक्कीच मात करू, मात्र त्यासाठी खातेधारकांचे सहकार्य हवे असल्याचे थॉमस म्हणाले.

Last Updated : Sep 24, 2019, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details