मुंबई - दरवर्षी मार्च महिन्याचा अखेरचा दिवस बँकांसाठी विशेष महत्वाचा असतो. 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस मानला जातो. पण यावर्षी ३१ मार्चला रविवार आला आहे. पंरतु, या दिवशी बँका सुरू ठेवण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व सरकारी बँकांना दिला आहे. यामुळे शेवटच्या दिवशीही सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना आयकर भरता येणार आहे.
आयकर भरण्यासाठी रविवारीही सुरू राहणार सरकारी बँका - open
सरकारी देवाण घेवाण व्हावी यासाठी ३१ मार्च २०१९ ला सरकारचे सर्व पे-अॅण्ड अकाऊंट्स सुरू राहणार आहेत. सरकारी देवाण घेवाणीचे व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या शाखा शनिवार ३० मार्चला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि ३१ मार्चला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार आहेत.
याबाबत रिझर्व्ह बँकेने एक पत्रकदेखील जारी केले आहे. सरकारी देवाण घेवाण व्हावी यासाठी ३१ मार्च २०१९ ला सरकारचे सर्व पे-अॅण्ड अकाऊंट्स सुरू राहणार आहेत. सरकारी देवाण घेवाणीचे व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या शाखा शनिवार ३० मार्चला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि ३१ मार्चला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. RTGS आणि NEFT आदी इलेक्ट्रॉनिक देवाण घेवाणीचे व्यवहारसुद्धा ३० आणि ३१ मार्चला अतिरिक्त वेळेपर्यंत सुरू राहतील, असेही आरबीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.