मुंबई -पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयकडून 35 अ नियमानुसार निर्बंध लादण्यात आल्यामुळे पंजाब महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने लादलेले हे निर्बंध पुढील सहा महिने राहणार आहेत. पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळल्याने आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
पीएमसी बँकेवर 'आरबीआय'कडून निर्बंध, मुंबईत बँक शाखेबाहेर लोकांची गर्दी - पीएमसी बँक बातमी
आरबीआने पंजाब महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. यामुळे ग्राहकानी मोठ्या प्रमाणात बँकेच्या शाखामध्ये गर्दी केली.
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे एमडी जॉय थॉमस यांनी याप्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. बँक ग्राहकांना या परिस्थितीतून लवकरात लवकर बँक बाहेर येईल असे आश्वासन दिलेल आहे. मात्र, या आश्वासनानंतर ही मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विविध शाखांत बाहेर ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून त्यांनी बँकेत ठेवलेल्या ठेवी व बचत रक्कमेबद्दल बँक प्रशासनाकडे विचारणा सुरू केली आहे. यामुळे काही शाखांमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याचे ही चित्र पाहायला मिळाले आहे .