मुंबई - दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन मेहनत घेताना दिसत आहे. अशा स्थितीत वेगवेळ्या सामाजिक संस्था, ट्रस्ट यांच्याकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक,कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी देणार आहेत. ही रक्कम 2 कोटी रुपये असणार असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
कोरोनाच्या लढ्यात रयत शिक्षण संस्थेचा हात, मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी देणार 2 कोटी - कोरोनाच्या लढ्यात रयत शिक्षण संस्थेचा हात
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन मेहनत घेताना दिसत आहे. अशा स्थितीत वेगवेळ्या सामाजिक संस्था, ट्रस्ट यांच्याकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक,कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी देणार आहेत.
शरद पवार
कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने काम करत आहे. मात्र, संपूर्ण देशभर संचारबंदी लागू असल्याने नवे आर्थिक संकट उभे राहिल्याचे शरद पवार म्हणाले. कोणत्याही अडचणीच्या काळात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या संस्था मदतीसाठी पुढे आल्याचे पवार म्हणाले.
TAGGED:
C M Relif fund