मुंबई : रवींद्र सिंघल हे महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ( Maharashtra State Additional Director ) आहेत. भारतीय पोलीस सेवेतील उच्च पदावर ते काम करतात. त्यांच्या आतमध्ये एक कलाकार दडलाय. त्या छायाचित्रांचे अप्रतिम कलेचे प्रदर्शन त्यांनी नुकतेच मुंबईत प्रख्यात जहांगीर कला दालनात भरवले. कला कोणतीही असो ती जर अंतरी असली तर माणसाच्या जीवनाला खरा आकार आणि दिशा मिळते. तसच अतिरिक्त आयुक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल यांचे झाले आहे. इयत्ता सातवी आणि आठवी असताना त्यांनी खेड्यातील एक दृश्य टिपले. त्यांनतर त्याचा नाद लागला. आता तो इतका लागला की त्यांची विचार दृष्टी समजल्यावर आपल्याला देखील त्या गोष्टींचा नाद लागल्या वाचून राहत नाही. पोलीस सेवेत असताना बढती आणि बदली हा नियम ठरलेला असतो. रवींद्र सिंघल यांच्या सारखे अधिकारी त्याला संधी मानून त्याचे सोनं करण्याचा प्रयत्न करतात. ( Indian Police Service )
Director General of Police : रवींद्र सिंघल अतिरिक्त पोलीस महासंचालकाचे दुसरे रूप; सांस्कृतिक विविधता जाणणारा कलाकार - Director General of Police
रवींद्र सिंघल सारखे अधिकारी त्याला संधी मानून त्याचे सोनं करण्याचा प्रयत्न करतात. भारतीय पोलीस सेवेतील उच्च पदावर ते काम करतात. त्यांच्या आतमध्ये एक कलाकार दडलाय. त्या छायाचित्रांचे अप्रतिम कलेचे प्रदर्शन त्यांनी नुकतेच मुंबईत प्रख्यात जहांगीर कला दालनात भरवले. कला कोणतीही असो ती जर अंतरी असली तर माणसाच्या जीवनाला खरा आकार आणि दिशा मिळते.
शेतकरी कष्टकरी जनतेचे छायाचित्रे: जीवन त्यांनी फोटोमध्ये काही प्रमाणात टिपण्याचा प्रयत्नजेव्हा ते नांदेड बीड आणि छत्तीसगड अश्या ठिकाणी काही काळ जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पोळा, तसेच शेतकरी कष्टकरी जनतेचे छायाचित्रे टिपले. त्यांना या संदर्भात ईटीव्ही भारत वतीने विचारला असता त्यांनी सांगितले की, सातवी ते आठवी मध्ये असताना त्यांना ब्लॅक अँड व्हाइट छायाचित्रे जमवण्याची ही सवय लागली आणि त्याच्यानंतर त्यांना त्याची आवड निर्माण झाली. जिथे जिथे माझी बदली झाली तिथे तिथे अस्सल भारत बनवणाऱ्या किंवा अस्सल देशी ग्रामीण म्हणून होणाऱ्या लोकांच्या हालचालीला त्यांच्या भावनेला टिपण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील पोळा सण असो, महाराष्ट्रातील आदिवासी असो किंवा छत्तीसगड येथील आदिवासी असो श्रमिक कष्टकरी यांचे जीवन त्यांनी फोटोमध्ये काही प्रमाणात टिपण्याचा प्रयत्न केला.
ग्रामीण जीवन दर्शन घडवणारे फोटो: या बातमीमध्ये चौपाल केलेला आहे त्यामध्ये लाल रंगाचा चौकटीचा सदरा आणि चष्मा घातलेले महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असणारे रवींद्र सिंगल त्यांच्यासोबत नांदेड आणि बीड या जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी हा चौपाल मुंबईच्या जहांगीर कलादालनात घेतलेला आहे यासोबत काही महत्त्वाचे अस्सल मराठी ग्रामीण जीवन दर्शन घडवणारे फोटो देखील त्यात आहे.या ठिकाणी राज्यातील मराठवाड्यातील एका शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील या कलेचे प्रदर्शन पाहायला जमल्या होत्या. त्यांच्यासोबत देखील ईटीवी च्या प्रतिनिधीने बातचीत केली यामध्ये या मुलींना जे वाटले ते त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितले की हे फोटो पाहून त्यातल्या पोळ्याचा सण त्यातले खेड्यातले लोक त्यातला शनिवारचा भरलेला बाजार बघून हे आमचेच आहे, असे त्यांनी म्हटले.