महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छ भारत अभियानाचा मुंबईत बोजवारा, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी साधला निशाणा

मुंबई स्वच्छ राहण्यास मदत होईल असा उद्देश असलेल्या या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधीही उपलब्ध झाला. मात्र, या योजनेला अद्याप गती आलेली नाही. निधी असताना, शिवाय अर्ज करूनही अनेक महिने रहिवाशांना प्रतीक्षा का करावी लागते आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

स्वच्छ भारत अभियानाचा मुंबईत बोजवारा, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी साधला निशाणा

By

Published : Nov 6, 2019, 11:31 PM IST

मुंबई -केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान सुरु केल्यानंतर मुंबई महापालिकेकडून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, या योजनेचा मुंबईत बोजवारा उडाला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये अनके ठिकाणी शौचालये तोडण्यात आली आहे. तर, घरोघरी शौचालय योजना कागदावरच राहिली आहे. ५० टक्के शौचालयांमध्ये पाणी नसल्याने ती बंद पडली आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त मुंबई केल्याचा स्वच्छतेचा पुरस्कार घेणाऱ्या मुंबई महापालिकेच्या या मोहिमेचा बोजवारा उडाला असल्याचं मत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधी पक्षनेते रवी राजा

केंद्र सरकारने सुरु केलेली स्वच्छ भारत अभियान मोहिम देशभर सुरु आहे. या योजनेंतर्गत मुंबई महापालिकेने स्वच्छ मुंबई करण्यासाठी ही योजना सुरु केली. मुंबईत ६० टक्के झोपडपट्टी परिसर आहे. एकास एक खेटून असलेल्या वस्त्यांत जवळपास शौचालये नसल्याने लोक उघड्यावर जातात. त्यामुळे दुर्गंधी पसरुन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हागणदारीमुक्त मुंबई करण्यासाठी पालिकेने घरोघरी शौचालये उभारण्यासाठी योजना आखली. मात्र, वस्त्यांमधील शौचालयांची अत्यंत दुरुवस्था आहे. घरोघरी शौचालय उभारण्यासाठी नागरिकांकडून भरून घेतलेले अर्ज धूळखात पडून आहेत.

हेही वाचा -श्रीगोंदामध्ये अवैध वाळू कारवाईत ४० लाख रुपये किमतीच्या 8 बोटी नष्ट

यावर हरकतीचा मुद्दा मांडत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. राऊत यांच्या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देत आपल्या विभागातील शौचालयांच्या दयनीय अवस्थेचा पाढा वाचला. मलनि:सारण वाहिनी नाही, म्हणून शौचालयाचे काम रखडले असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, त्यावरही अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेले नाही.

मुंबई स्वच्छ राहण्यास मदत होईल असा उद्देश असलेल्या या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधीही उपलब्ध झाला. मात्र, या योजनेला अद्याप गती आलेली नाही. निधी असताना, शिवाय अर्ज करूनही अनेक महिने रहिवाशांना प्रतीक्षा का करावी लागते आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला. अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. यावर येत्या बैठकीत शौचालयांची माहिती सादर करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

हेही वाचा -नवी मुंबईतील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांचा कचरा; नागरिकांना त्रास

गोवंडी शिवाजी नगरात ५० टक्के शौचालये बंद -
मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. गोवंडी शिवाजी नगर परिसरात सुमारे ९ लाख नागरिकांसाठी अवघे ५०० शौचालये बांधण्यात आली आहेत. यातील ९० टक्के शौचालयांना मलनि:सारण वाहिनी नाही. ५० टक्के शौचालये मोडकळीस आले आहेत. तर, ६५ टक्के शौचालयांमध्ये पाणीच नाही. अनेक समस्यांमुळे असलेली शौचालयेही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते, हे वास्तव नगरसेवकांनी समोर आणले.

ABOUT THE AUTHOR

...view details