महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एक आयुक्त पुरेसा..रवी राजांनी अस्लम शेख यांना दिला घरचा आहेर - 2 Municipal Commissioner news

मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पालिकेसाठी दोन आयुक्त हवेत, असे मत व्यक्त केले होते. त्यावर काँग्रेसचे पालिकेमधील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी, हे त्यांचे मत आहे काँग्रेसचे नाही, असे सांगत शेख यांना घरचा आहेर दिला आहे.

Ravi Raja
रवी राजा

By

Published : Jan 10, 2021, 7:43 PM IST

मुंबई - मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पालिकेसाठी दोन आयुक्त हवेत, असे मत व्यक्त केले होते. त्यावर काँग्रेसचे पालिकेमधील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी, हे त्यांचे मत आहे काँग्रेसचे नाही, असे सांगत शेख यांना घरचा आहेर दिला.

प्रतिक्रिया देताना महापालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा

हेही वाचा -राज ठाकरे अन् भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याने विरोधकांचा हल्लाबोल

अस्लम शेख यांनी मुंबई शहर व उपनगर असे दोन जिल्हे आहेत. या दोन जिल्ह्यांसाठी दोन पालकमंत्री, दोन जिल्हाधिकारी आहेत. मग पालिकेचे आयुक्त दोन का नकोत, असा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई महापालिकेतही दोन आयुक्त हवेत, असे मत शेख यांनी व्यक्त केले होते. यावर पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्याशी संपर्क साधला असता, हे शेख यांचे मत आहे काँग्रेसचे मत नाही, असे म्हटले.

उपनगरला आयुक्तांनी वेळ द्यावा

मुंबई महापालिकेच्या नियमानुसार एकच आयुक्त असे म्हटले आहे. पालिकेत आयुक्तांच्या मदतीला आयएएस असलेले चार अतिरिक्त आयुक्त, सात उपायुक्त आणि २४ विभागात सहाय्यक आयुक्त काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून पालिकेचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे, असे रवी राजा यांनी म्हटले. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नागरिकांना पालिका मुख्यालयात जाता येत नाही. त्यांच्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी आठवड्यातून एकदा पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी वेळ द्यायला हवा. तसेच, पालिका आयुक्तांनी महिन्यातून एकदा पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी वेळ द्यायला हवा, असे रवी राजा यांनी म्हटले.

काय म्हणाले होते अस्लम शेख

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून, देशातील विविध भागातून नागरिक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचाच परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. परंतु, सध्या महापालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय, मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन पालिका आयुक्त असणे गरजेचे आहे, असे अस्लम शेख म्हणाले होते.

हेही वाचा -राज ठाकरे अन् भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याने विरोधकांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details