महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ration Kit: सरकार म्हणते दिवाळी जोरात; आनंदाचा शिधा मात्र कोमात! - शिधा नसल्याने दुकांनच बंद

Ration Kit: सर्वसामान्य गरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर पामतेल या चार वस्तू 100 रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने ४ ऑक्टोंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला Taken in Cabinet meeting आहे. याला २० दिवसांचा कालावधी लोटला period of 20 days has passed आहे. तरीसुद्धा हा शिधा अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी गरिबापर्यंत पोहोचलेला नाही. कारण हा शिधा तसेच यातील काही जिन्नस राशन वितरण दुकानावरच पोहचलेला नसल्याकारणाने याचा बोजवारा उडाला आहे.

Ration Kit
Ration Kit

By

Published : Oct 25, 2022, 7:11 PM IST

मुंबई: सर्वसामान्य गरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर पामतेल या चार वस्तू 100 रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने ४ ऑक्टोंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला Taken in Cabinet meeting आहे. याला २० दिवसांचा कालावधी लोटला period of 20 days has passed आहे. तरीसुद्धा हा शिधा अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी गरिबापर्यंत पोहोचलेला नाही. कारण हा शिधा तसेच यातील काही जिन्नस राशन वितरण दुकानावरच पोहचलेला नसल्याकारणाने याचा बोजवारा उडाला आहे.

सरकार म्हणते दिवाळी जोरात; आनंदाचा शिधा मात्र कोमात

ऑनलाइन प्रक्रियासह ऑफलाईन सुरू:राज्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील पात्र सुमारे 1 कोटी 62 लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे 7 कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण करण्यात येत आहे. त्यात एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर पामतेल या 4 वस्तू 100 रुपयांत देण्यात येत आहेत. आतापर्यंत ऑनलाईन असलेली प्रक्रिया लवकरात लवकर शिधा लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणून कालपासून ऑफलाइन सुरू करण्यात आली आहे.

शिधा नसल्याने दुकांनच बंद:परंतु सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा या योजनेचा वितरणाचा बोजवारा उडाला असून अद्याप लाखो नागरिकांना तो मिळालेला नाही. त्यामुळे आजही दुकानात चौकशी करण्यासाठी नागरिक जात आहेत, पण दुकानात सामानच उपलब्ध नसल्याकारणाने वारंवार नागरिक येऊन विचारणा करत असल्याने दुकानच बंद ठेवण्यात आल्याचं वितरकांनी सांगितल आहे.

शिधा लवकरच पोहोचला जाईल: बऱ्याच ठिकाणी साखर व रवा उपलब्ध झाला असून चणाडाळ व पामतेल उपलब्ध झाले नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी साखर, रवा व पाम तेल पोहोचले असून चणाडाळ पोहचली न समोर आलं आहे. राजकारणी मात्र शिधा लवकरात लवकर पोहोचला जाईल. दीपावली संपायला आली आहे का ? संपली आहे का ? असं सांगण्यामध्ये मग्न आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही फार मोठी योजना असून हा शिधा जनतेपर्यंत पोहोचायला उशीर होईल, परंतु दिवाळी अद्याप संपलेली नाही असे सांगितले आहे.

योजना थोडी उशिराच जाहीर केली? अनेक ग्रामीण भागामध्ये आदिवासी बांधव राहत असूनही आदिवासी पाड्यावर गरिबांची दिवाळी गोड व्हावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशन दुकानातून तेल, चणाडाळ, रवा व साखर यासारखे जिन्नस अंतोदय योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. मात्र अनेक भागातील रेशन दुकानात अत्यंत योजनेतील साहित्य ३० ते ४० टक्केच पोहचले आहे. त्यामुळे अनेकांना रेशन दुकानात रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. आनंदचा शिधा अजूनही ग्रामीण आदिवासी भागात पोहोचला नसल्याचे वास्तव्य समोर आलं आहे. व हे वास्तव्य स्वतः केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मान्य केले, असून राज्य शासनाने आनंदाचा शिधा योजनेची घोषणा थोडी उशिराच केली, अशी जाहीर कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details