मुंबई,Ration Card Application Status : रेशन कार्ड हे राज्य सरकारनं जारी केलेलं अधिकृत दस्तऐवज आहे. याद्वारे पात्र कुटुंबं अनुदानित दरानं धान्य खरेदी करू शकतात. राज्यातील ज्या लोकांना अद्याप रेशन कार्ड (Ration card) मिळालेलं नाही, ते ऑनलाइन माध्यमातून अर्ज करून ते मिळवू शकतात. मात्र नागरिक रेशन कार्डच्या ज्या प्रकारासाठी अर्ज करत आहेत त्यासाठी ते पुरेसे पात्र असले पाहिजेत. (Ration card application maharashtra)
घरबसल्या यादीत नाव पाहता येणार : महाराष्ट्रातील ज्या नागरिकांनी रेशन कार्ड स्टेटससाठी अर्ज केला आहे, त्यांना रेशन कार्ड यादीत आपलं नाव पाहण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. रेशन कार्ड यादीत त्यांना त्यांचं नाव घरबसल्या पाहता येणार आहे (Ration card online check). दरवर्षी शिधापत्रिका यादीतील नावं महाराष्ट्र शासनाकडून लाभार्थीच्या वयानुसार अपडेट (Ration card online update) केली जातात.
रेशन कार्डची तीन प्रकारात विभागणी : महाराष्ट्र शासनाने रेशन कार्डची तीन प्रकारात विभागणी केली आहे. लोकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ही विभागणी करण्यात आली आहे.
- APL रेशन कार्ड : हे रेशन कार्ड दारिद्र्यरेषेच्या वर असलेल्या लोकांना दिलं जातं. APL रेशन कार्ड मिळविण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न १,००,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावं लागतं. या रेशन कार्डचा रंग पांढरा असतो.
- BPL रेशन कार्ड : दारिद्र्यरेषेखालील लोकांना BPL रेशन कार्ड दिलं जातं. BPL रेशन कार्ड मिळविण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न १५,००० ते १,००,००० रुपयापर्यंत असावं लागतं. हे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं असतं.
- अंत्योदय रेशन कार्ड : अंत्योदय रेशन कार्ड अत्यंत गरीब लोकांना दिलं जातं. हे रेशन कार्ड भगव्या रंगाचं असतं. जे लोक कमावते नाहीत, त्यांना हे रेशन कार्ड दिलं जातं.
रेशन कार्डचे फायदे :
- रेशन कार्ड राज्यातील लोकांची ओळख म्हणून काम करतं.
- हे एक असं दस्तऐवज आहे, जे राज्यातील नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत जारी केलेले तांदूळ, गहू, साखर, केरोसीन, तीळ इत्यादी अनुदानित धान्य आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतं.
- APL, BPL रेशन कार्डमुळे राज्यातील जनतेला अत्यंत कमी किमतीत धान्य आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्यास मदत होते. याद्वारे त्यांचा आर्थिक भार कमी होतो.