मुंबई Rashmi Shukla News : फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या आणि नंतर क्लीन चिट मिळालेल्या महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची अलीकडेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली असे वावडे उठले होते. मात्र, सध्या तरी रजनीश सेठ हेच राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कारभार सांभाळत आहेत. रश्मी शुक्ला केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. दरम्यान, राज्य सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे.
वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला पुढील आठवड्यात मुंबई पोलीस आयुक्त होऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. सध्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे राज्याचे पोलीस महासंचालक होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन आयपीएस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त मुंबई पोलीस मुख्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागातील कार्यरत सहआयुक्त (L&O) सत्यनारायण चौधरी यांना देखील राज्य पोलीस मुख्यालयात पाठवलं जाऊ शकतं.
काही जणं पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडण्याच्या तयारीत :सत्यनारायण चौधरी हे एक चांगले व्यक्ती आणि हुशार अधिकारी आहेत हे सर्वांना माहीत आहे. कृष्ण प्रकाश उर्फ केपी यांना त्यांच्या जागी आणलं जाऊ शकतं. गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनाही पोलीस आयुक्त मुख्यालयातून बाहेर पडायचे आहे. ते सरकार आणि राज्य सरकारचे कार्यकारी यांच्यात समन्वय राखण्यास सक्षम नाहीत. आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त निशिथ मिश्रा यांचीही अशीच मनस्थिती आहे. निशिथ मिश्रा हे काव्यशैली असलेली व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहीत असेल. मात्र, त्यांनाही मुंबई पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडायचं असल्याचं सांगण्यात येतंय.
रश्मी शुक्लांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती : दरम्यान, राज्य सरकारनं 3 ऑक्टोबर रोजी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते. त्यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्यानं त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली असं सांगण्यात आले. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.