मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना सायबर विभागाने समन्स पाठवला होता. यात त्यांना 28 एप्रिल 2021 रोजी जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, रश्मी शुक्ला यांनी प्रत्येक्ष जबाब नोंदवण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्य:स्थितीत हैदराबाद येथील कार्यालय सोडून मुंबईला येण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी चौकशीसाठीची प्रश्नावली मागितली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नेमके प्रकरण काय?
रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. 25 ऑगस्ट 2020 रोजी कथित बदल्यांच्या रॅकेट संदर्भात काही व्यक्तींचे फोन टॅप करुन त्याचा एक अहवाल बनवण्यात आला होता. हा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना तसंच गृहविभागाला पाठवण्यात आला होता. मात्र, अधिकारांचा गैरवापर असल्याचे सांगत हा अहवाल फेटाळण्यात आला. यानंतर तोच गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उघड करत राज्य सरकारवर आरोप केले.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा अहवाल -
फोन टॅपिंग प्रकरण : जबाब नोंदवण्यास रश्मी शुक्ला असमर्थ, दिले कोरोनाचे कारण - Rashmi shukla phon tapping case
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्य:स्थितीत हैदराबाद येथील कार्यालय सोडून मुंबईला येण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी चौकशीसाठीची प्रश्नावली मागितली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
रश्मी शुक्ला
या प्रकरणात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना एक रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कुंटे यांनी आपल्या रिपोर्टमध्ये नोंद केली आहे की, 2020 मध्ये एकूण 167 बदल्या करण्यात आल्या आहेत यातील 4 बदल्या या अपवाद आहेत . बाकी सर्व बदल्या या पोलीस आस्थापना बोर्ड-1 च्या शिफारिशीनुसार आहेत.