मुंबई - मुंबई पोलिसांकडून कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( FIR Against Rashmi Shukla in Kulaba Police ) हा FIR रद्द करण्यात यावा, याकरिता वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली आहे. ( Rashmi Shukla Petition in Mumbai High Court ) या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे पुण्यातील फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देखील दिला होता.
राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.