मुंबई Rashmi Shukla DGP : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागानं 30 डिसेंबर रोजी फोन टॅपींग प्रकरणी वादात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केलीय. महाराष्ट्रात महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त झालेल्या रश्मी शुक्ला या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.
विविध पदावर काम केल्याचा अनुभव : रश्मी शुक्ला ह्या 1988 वर्षीच्या तुकडीच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी आहेत. त्या सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक या पदावर देखील काम करण्याचा अनुभव आहे. रश्मी शुक्ला यांची केंद्र शासनाच्या प्रतिनियुक्तीवर नियुक्ती होण्याआधी त्यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. केंद्र शासनाच्या नियुक्तीमुळं पुण्याच्या पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर शाखेच्या संचालक म्हणून त्यांनी काम केलं होतं.
रजनीश सेठ यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची वर्णी : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ डिसेंबर 2023 मध्ये सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या जागी आता रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केलीय. त्याबाबत 30 डिसेंम्बर रोजी महाराष्ट्र शासनानं अधिकृतरित्या जाहीर केलंय.
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, मविआ सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणी सापडल्या होत्या वादात - रजनीश सेठ
Rashmi Shukla DGP : मविआ सरकारच्या काळात वादात सापडलेल्या अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलीय. राज्य शासनाच्या गृह विभागानं याबाबतचे आदेश काढले आहेत.
Published : Dec 30, 2023, 12:52 PM IST
नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप : महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकाळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्याविषयी आरोप देखील केले गेले होते. यावरुन त्यावेळी चांगलंच राजकारण तापलं होतं. मात्र याबाबतचा खटला उच्च न्यायालयात दाखल झाल्यावर उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिला होता. मात्र रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारत निराधार असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा :