नवी मुंबई -अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवून गर्भवती करणाऱ्या नराधमाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उलवे सेक्टर २ मध्ये संबंधीत अल्पवयीन मुलगी राहत असून ती घरकाम करते. या 15 वर्षीय अल्पवयीन युवतीची एका तीस वर्षीय विवाहित युवकासोबत चार महिन्यापूर्वी ओळख झाली. मैत्री वाढवण्याच्या नादात नराधमाने अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. संबधीत तरुण विवाहित असल्याची कल्पना न देता तिच्यावर दबाव टाकत जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या शारीरिक संबंधातून ती दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती राहिल.
Navi Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर दबाव टाकून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक - ठाणे जिल्हा गुन्हे नवी मुंबई
15 वर्षीय अल्पवयीन युवतीची एका तीस वर्षीय विवाहित युवकासोबत चार महिन्यापूर्वी ओळख झाली. मैत्री वाढवण्याच्या नादात नराधमाने अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. संबधीत तरुण विवाहित असल्याची कल्पना न देता तिच्यावर दबाव टाकत जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या शारीरिक संबंधातून ती दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती राहिल.
अटक केलेले आरोपी
Last Updated : Apr 1, 2022, 4:31 PM IST