महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Measles Patients : मुंबईत गोवरचे ५ नावे रुग्ण, संशयित रुग्णांची संख्या ५ हजार ३९४ वर - measles patients in Mumbai

मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत ( Number of measles patients increased in Mumbai ) आहे. पालिकेच्या २४ पैकी २० विभागात गोवरचा प्रसार झाला आहे.

Measles in Mumbai
मुंबईत गोवर

By

Published : Dec 29, 2022, 10:16 PM IST

मुंबई -मुंबईत आज गोवरचे निश्चित निदान झालेले ५ रुग्ण आढळून आल्याने ( ( Number of measles patients increased in Mumbai ) ) आतापर्यंत निश्चित निदान झालेल्या एकूण ५३६ रुग्णांची तर ५३९४ संशयित रुग्णांची नोंद झाली ( measles patients increased in Mumbai ) आहे. आतापर्यंत गोवरमुळे १८ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १५ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे.

४ रुग्ण व्हेंटिलेटरवर - मुंबईत १ कोटी ५ लाख ३३ हजार ३४२ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ५३९४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ५३६ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३७ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ९९ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १७३ जनरल बेडपैकी ९०, १२९ ऑक्सीजन बेड पैकी ३, ३५ आयसीयु बेडपैकी ६ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी ४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

गोवर मुळे १८ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १८ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १५ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १५ मृत्यूपैकी ९ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ६ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

या उपाययोजना -गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details