महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 26, 2023, 10:00 PM IST

ETV Bharat / state

पंधरा वर्षीय बलात्कारीत मुलीचा 28 आठवड्याचा गर्भपात करता येणार नाही - हायकोर्ट

पंधरा वर्षीय बलात्कारीत मुलीचा 28 आठवड्याचा गर्भ आहे. मात्र हा गर्भपात करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यासंदर्भात नुकताच निर्णय दिला आहे. बाळ आणि पंधरा वर्षाची गरोदर माता यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून खंडपीठाने हा निर्णय घेतला.

हायकोर्ट
हायकोर्ट

मुंबई - पंधरा वर्षे वयाच्या बालिकेवर बलात्कार झाला आणि आता तिला गर्भधारणा होऊन 28 आठवडे झाले. परंतु तिच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गर्भपात करण्याची परवानगी नाकारली आहे.




गर्भधारणा होऊन 28 आठवडे -पंधरा वर्षाच्या एका बालिकेवर एका व्यक्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिला गर्भधारणा झाली. परंतु गर्भधारणा होऊन 28 आठवडे झाले. मग या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये गर्भपात करण्यासंदर्भातला खटला दाखल झाला. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गर्भपाताला परवानगी नाकारली. याचं कारण मुलीच्या शरीरात वैद्यकीय आणि शारीरिक गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळेच मुलीचा जीव महत्त्वाचा आहे; असे म्हणत न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या औरंगाबाद खंडपीठाने गर्भपाताला स्थगिती दिली.



गर्भपात करता येणार नाही -गर्भपाताला स्थगिती देताना औरंगाबाद खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, 28 आठवड्यांचा गर्भ झालेला आहे. त्याच्यामुळे गर्भपात करता येणार नाही. म्हणून आता ही गर्भधारणांना नैसर्गिक रीतीने होऊ द्यावी. त्याचे कारण बाळ जन्माला येण्यासाठी आता बाकीचे बारा आठवडे नैसर्गिक रीतीने गर्भधारणा सुरू ठेवावी. नंतर तिची प्रसृती होऊ द्यावी आणि त्या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने तिची जबाबदारी घ्यावी.


मुलीच्या जीवाला धोका होऊ शकतो -खंडपीठाने असे देखील म्हटले आहे की, आता नैसर्गिक रितीने बाळ जन्माला येण्यासाठी 12 आठवडे प्रसुतीला उरलेले आहे. असे असताना 28 आठवड्यांचा गर्भपात करणे म्हणजे मुलीच्या जीवाला धोका होऊ शकतो. गर्भपात जरी केला तरी मूल जिवंत जन्माला येईल. त्या मुलामध्ये वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्याच्या शारीरिक काही बदल होऊ शकतो. त्याच्या आयुष्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल म्हणजे दोघांच्या जीविताला काही अडचण होऊ नये; म्हणूनच हा गर्भपाताचा निर्णय आणि नाकारत असल्याचे खंडपीठाने नमूद केले.


ज्या मुलीवर बलात्कार झाला आहे आणि जी पंधरा वर्षाची आहे. तिची गर्भधारणा 24 आठवड्यांची झाली. तेव्हा त्या बालिकेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या संदर्भात प्रकरण दाखल केलं. त्यानंतर हा खटला जळगाव येथील न्यायालयातून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये वर्ग झाला. खंडपीठाने आईच्या एकूण वैद्यकीय आणि शारीरिक स्थितीबाबत तपासणी करून अहवाल देण्याचे निर्देशही कोर्टाने दिले होते.



तज्ञ वैद्यकीय डॉक्टरांच्या समितीने जो अहवाल दिला, त्यामध्ये मत व्यक्त केले आहे की, बाळ जिवंत जन्माला येईल. परंतु त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवणे आवश्यक आहे. शिवाय काही महत्त्वाच्या शस्त्रक्रिया देखील कराव्या लागतील. रक्तपुरवठा गरजेचा असेल. त्या पंधरा वर्षाच्या बालिकेला देखील अतिदक्षता विभागात दाखल करावे लागेल. शिवाय दोन्हींच्या शरीरामध्ये आणि होणाऱ्या बाळाच्या शरीरामध्ये देखील गंभीर गुंतागुंत येऊ शकते. त्यामुळेच या सर्व वस्तुनिष्ठ बाबी पहात खंडपीठाने नैसर्गिक रीतीने गर्भधारणा आणि त्यानंतर बाळंतपण होणे जरुरी असल्याचे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने असा आदेश जारी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details