मुंबई :टी सिरीजचा मालक भूषण कुमार याच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. खटल्यातील पीडित बलात्कारीत महिलेने तक्रार आता मागे घेतलेली आहे. असा दावा करत 'त्यामुळे तिची संमती मिळाली आहे' असे समजून त्याच्यावरील दाखल केलेला एफआयआर रद्द करा' अशी केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. टी सिरीज या ध्वनिमुद्रण कंपनीचा मालक भूषण कुमार याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे.
बलात्कार केल्याचा खटला :पोलीस ठाण्यामध्ये त्याबाबत एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याच्यापुढे खटला देखील सुरू झाला. परंतु जिच्यावर बलात्कार झालेला आहे. त्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे, असा दावा भूषण कुमारकडून करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर तिने दाखल केलेला एफआयआर हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने या याचिकेच्या संदर्भात अधोरेखित केले की, बलात्काराचा गुन्हा हा गंभीर गुन्हा असतो.