महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिरज ते पुणे रेल्वेमार्ग दुहेरीकरण; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दिले 'हे' महत्त्वाचे आदेश - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve On Pune Miraj : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत प्रलंबित कामं लवकर पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Miraj to Pune Doubling
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 10:13 AM IST

मुंबई Raosaheb Danve On Pune Miraj : पुणे ते मिरज हा रेल्वेमार्ग एकेरी असून त्याचं दुहेरीकरण करण्यासाठी रेल्वे विभागानं कंबर कसलेली आहे. या मार्गाचं काम कसं सुरु आहे. तसंच इतर रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पाबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्यालयात रेल्वे महाप्रबंधक यांच्या सोबत 29 नोव्हेंबर रोजी बैठक घेत आढावा घेतला. तसंच उर्वरित कामं वेगानं करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.



दुहेरीकरण झाल्यास नागरिकांना फायदा : मिरज ते पुणे हा एकेरी मार्गाऐवजी त्याचं दुहेरीकरण करण्याबाबत रेल्वे विभागानं त्यात लक्ष घातलेलं आहे. दुहेरीकरण झाल्यावर सहा तासांचा हा मार्ग चार तासांवर येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना हा प्रवास जलद गतीनं करता येईल. त्यामुळं या परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळंच या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुख्यालयात भेट देऊन विविध उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भूसंपादन काम कोणत्या टप्प्यात आलंय याचा आढावा देखील घेतला. पुणे ते मिरज हा रेल्वेमार्ग दुहेरी झाला तर पुण्यापासून सांगली तसंच सातारा, कोल्हापूर आणि त्याच्यानंतर पुढं दक्षिणेकडं मार्ग जातो.

काम वेगानं करण्याच्या सुचना : पुणे ते मिरज हा दुहेरी रेल्वे मार्ग करण्यामध्ये अनेक अवघड वाटा आहेत. छोटे-मोठे डोंगर आहेत. डोंगराळ भाग देखील त्यामध्ये येतो त्यामुळंच तिथून दुहेरी मार्ग होणं जरा अवघड आहे. त्यामुळेच रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी उच्च अधिकारी मंडळी सोबत बैठक घेत काम वेगानं करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी आणि पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे या बैठकीला उपस्थित होत्या.

हेही वाचा :

  1. CSMT Kurla Railway Track : बारा वर्षे रखडलेल्या 'या' रेल्वे मार्गाच्या कामात साडेतीनशे कोटींची वाढ
  2. Konkan Railway : कोकण रेल्वे भारतात येत नाही का? असे का म्हणतात प्रवासी? जाणून घ्या...
  3. Mumbai-Hyderabad Bullet Train : मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम लवकरच सुरु; अंतिम डीपीआर सादर

ABOUT THE AUTHOR

...view details