महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे राणीची बाग बंद, आठ महिन्यात ४ कोटींचा महसूल बुडाला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. मुंबईत कोरोनाने कहर केला होता. त्यामुळे राणीबाग बंद आहे. बाग बंद असल्यामुळे गेल्या आठ महिन्यात ४ कोटींचा महसूल बुडाला आहे.

Ranibagh Mumbai
राणीबाग मुंबई

By

Published : Nov 13, 2020, 7:50 AM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. तेव्हापासून आतापर्यंत भायखळा येथील राणीबाग म्हणजेच विर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी बंद आहे. पर्यटकांची वर्दळ कमी झाल्याने पालिकेचा मागील आठ महिन्यांत सुमारे चार कोटींचा महसूल बुडाला आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाची राणीबाग -

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीबागेला पर्यटक हजारोंच्या संख्येने भेट देतात. काही वर्षांपूर्वी प्राण्यांचा मृत्यू झाल्याने राणीबाग आणि पालिका प्रशासनावर टिका झाली होती. प्राणी प्रेमी संघटनांनी निदर्शनेही केली. या दरम्यान राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्राण्यांना त्रास होणार नाही. त्यासाठी प्राण्यांसाठी पिंजरे बनवण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांना प्राणी पाहता, यावेत म्हणून या पिंजऱ्याना काचा लावण्यात आल्या आहेत.

४ कोटींचा महसूल बुडाला -

२०१७ मध्ये राणीबागेत हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची संख्या वाढू लागली. राणीबागेत सरासरी दिवसाला १५ हजार पर्यटक भेट देतात. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवसांत हा आकडा ३० हजारपर्यंत जात होता. महिन्याला सुमारे ४५ लाखाचा महसूल यातून मिळत होता. गेल्या आठ महिन्यापासून राणीची बाग पर्यटकांसाठी बंद असल्याने प्रतिदिवस दीड लाखांचा तर गेल्या आठ महिन्यात ४ कोटींचा महसूल बुडाला आहे.

प्राण्यांची विशेष काळजी -

कोरोना विषाणूने अमेरिकेत न्यूयॉर्क येथे एका वाघिणीला कोरोना विषाणूची लागण झाली होती. या विषाणूचा प्रसार मुंबईतही झाला असल्याने भायखळाच्या राणीबागेत असलेल्या 300 हुन अधिक प्राणी आणि पक्षांची विशेष काळजी घेतली जात आहे. अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे प्रमुख डाॅ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

हेही वाचा-मुंबईत काल ८५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १९ रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा-पहिले दाऊदचा बाप काढायचे, मग नवाज शरीफचा, आता हिंदुत्व गेल्याने आमचा बाप काढावा लागतो..

ABOUT THE AUTHOR

...view details