मुंबई :आमदार रवी राणा यांनी आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू ( Former Minister Bachu Kadu ) यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याची केंद्रीय तपास यंत्रणांनी दखल घ्यावी. एका जबाबदार आमदाराने दुसऱ्या आमदारावर केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय तपास यंत्रणांनी आता तरी चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा या तपास यंत्रणा पक्षपाती आहेत. हे सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress chief spokesperson Atul Londhe ) यांनी दिली आहे.
बच्चू कडूंवर पैसे घेतल्याचा आरोप : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर सत्तांतरासाठी पैसे घेतल्याचा जाहीर आरोप केला आहे. वास्तविक आमदार देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. दरम्यान बच्चू कडू यांनीही त्यांना आव्हान दिले असले तरी या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे.