महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rana Attempt's For Bail : राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, आता शुक्रवारी सुनावणी - मुंबई उच्च न्यायालय

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी जामीन मिळवण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती मात्र त्यांना तेथेही दिलासा मिळाला नाही.(bail application in Sessions Court) शनिवारी त्यांना खार पोलिसांनी अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) आहेत. त्यांच्या जामीनावर आता शुक्रवारी 29 रोजी सुनावणी होणार आहे.

Navneet and Ravi Rana
नवनित आणि रवी राणा

By

Published : Apr 26, 2022, 9:25 AM IST

Updated : Apr 26, 2022, 12:53 PM IST

मुंबई:पोलिसांसोबत हुज्जत घातल्या प्रकरणात एफआयआर रद्द करावा यासाठी दाखल केलेली याचिका राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळल्यानंतर राणा दाम्पत्यांने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र राणा दाम्पत्यांला सेशन कोर्टातही दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता शुक्रवारी 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

अर्जावर सुनावणी सुरू असताना राणा दाम्पत्याचे वकील अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. 27 एप्रिलला सरकारी वकील मुंबई सत्र न्यायालयात आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडणार आहेत आणि त्यानंतर 29 एप्रिलला जामिन अर्जावर सुनावणी होईल.

याआधी वांद्रे न्यायालयातील जामीन अर्ज मागे घ्यावा लागेल तरच सत्र न्यायालयात सुनावणी होईल. दरम्यान आम्ही वांद्रे न्यायालयातील अर्ज मागे घेत आहेत असे राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 29 एप्रिलपर्यंत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कारागृहातच रहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उच्च न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांची एफआयआर रद्द करण्यात यावा यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी राणा दाम्पत्याने पोलिसांना विरोध करणे गैर असल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. अशातच राजद्रोहाच्या आरोपात जामीन देण्याचे अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नाहीत. त्यामुळे तिथला वेळ वाचवण्यासाठी दंडाधिकारी कोर्टातील याचिका मागे घेत थेट सत्र न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय राणा दांपत्याने घेतला आहे.



नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता.

नंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसापठणासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्या दिवशीची त्यांची रात्र पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.नंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

हेही वाचा :Somaiya's New Tweet : सोमय्या म्हणतात तो एफआयआर माझा नाहीच

Last Updated : Apr 26, 2022, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details