मुंबई : 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणारच असा हट्ट राणा दाम्पत्यांनी धरला या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी राणादांपत्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवले. मात्र त्यांनी 'या गुन्ह्यातून त्यांना दोष मुक्त करावे' असा अर्ज केला आहे. आज या संदर्भात दोष मुक्तते बाबत सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा हजर नसल्याने आमदार रवी राणा यांना सवाल करत दोन्ही आरोपीनी नियमितपणे हजर राहणे अनिवार्य आहे.असे स्पष्ट करत त्यांच्यावर ताशेरे ओढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.
या आधिही उपस्थित राहण्याचे निर्देश : मागील वेळी रवी राणा यांनी अटक वारंट टाळण्यासाठी हजेरी लावली होती.अन्यथा अटकेची टांगती तलवार होतीच. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी विचारले खासदार नवनीत राणा कुठे आहेत? त्यावर पती रवी राणा उत्तरले, त्या लोक सेवक आहेत जनतेच्या अत्यावश्यक कामाच्यासाठी त्या गैर हजर आहेत. त्यांना त्या बाबत सूट मिळावी, असा विनंती अर्ज दाखल केला आहे..यावेळी कोर्टाने संताप व्यक्त करत ताशेरे ओढले; न्यायालयात नियमितपणे हजेरी का लावत नाहीत.नियमानुसार हजर राहणे आवश्यक आहे.असे स्पष्ट केले होते
आ. राणा हजर पणा खा. गैरहजर : 15 दिवसांपूर्वी या पुर्वीच्या सुनावणीस नवनित राणा हजर होत्या. मात्र त्यांना उशिर झाला होता. या बाबत त्यांना न्य़ायालयाने चांगलेच सुनावले होते. आणि "पुढच्या वेळेला वेळेत हजर व्हा " असे निर्देश दिले होते. त्यावेळी तसेच दुसरे आरोपी रवी राणा उपस्थित नव्हते त्यांच्या बाबतचा प्रश्न देखील न्यायालयाने आरोपींना केला होता. याची जाणीव ठेवत आज मात्र वेळेत आमदार रवी राणा हजर राहिले.
सात्यताने गैरहजर : हनुमान चालीसा प्रकरणात कायदा सुव्यवस्थेचा भंग केल्या प्रकरणात नवनीत राणा या आरोपी आहेत. सातत्याने कोर्टात राणादांपत्य सुनावणीसाठी हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस म्हटले होते की 19 जून रोजी व्यक्तिशः जर राणादांपत्य कोर्टात हजर राहिले नाहीत तर त्यांच्या नावे वॉरंट काढावे लागेल. त्यामुळे आज ते कोर्टात हजर राहिले. त्यांचे वकिल रिझवान मर्चंट यांनी नवनीत राणा याना गैर हजर राहण्यासाठी परवाणगी मागणारा अर्ज दाखल केला. त्यामुळे खात्यांचे वारंट टळले होते.