मुंबई :पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मागील दोन वर्षानंतर आता पुन्हा एकदा हा व्यवसाय जोर धरताना दिसत आहे. यासाठी मुंबईमध्ये आशियातील सर्वात मोठे ओटीएम मुंबई हे प्रदर्शन सुरू झाले असून ते 4 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. यामध्ये देश विदेशातून हजारोंच्या संख्येने पर्यटन व्यवसायातील मतभर सहभागी झाले आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच याची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे उपलब्ध आहेत. देश विदेशातील स्टॉलमध्ये हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी यांचा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणायचे झाले तर रामोजी फिल्म सिटी नजरेसमोर येत असे इथे भेट देणारे हौशी पर्यटक सांगत आहेत.
हैदराबाद रामोजी फिल्मसिटी एक समीकरण :याविषयी बोलताना पर्यटक मयूर गायकवाड म्हणतात की, हैदराबाद म्हटले की, रामोजी फिल्म सिटीला भेट देणे फार गरजेचे आहे. कारण हैदराबाद, रामोजी फिल्म सिटी हे आता एक समीकरणच बनलेल आहे. इथे विविध प्रकारचे सेट बघायला भेटतात. एक दिवसाचा पूर्ण सहकुटुंब करमणुकीचा कार्यक्रम सुद्धा येथे होतो. लहान मुलांपासून, मोठ्यांसाठी अनेक प्रकारचे कर्मणुकीचे कार्यक्रम इथे आहेत. इथे विविध प्रकारचे झोन सुद्धा आहेत. इथे पोचण्यासाठी विविध विभागातून बस सर्विस सुद्धा उपलब्ध आहे. बाहुबली सारख्या चित्रपटाची शूटिंग सुद्धा रामोजी फिल्मसिटीमध्ये झाली असून, इथले फिल्मीसेट बघण्यासारखे आहेत. एकंदरीत रामोजी फिल्म सिटी बघणे म्हणजे, एक स्वप्नच पूर्ण करण्यासारखे असते, असंही मयूर गायकवाड सांगतात.
रामोजी फिल्मसिटीचे विविध रंग : रामोजी फिल्मसिटी हे विश्रांती आणि मनोरंजनाचे प्रसिद्ध केंद्र आहे. थीमॅटिक हॉलिडे डेस्टिनेशन ते सिनेमॅटिक आकर्षणे, परस्परसंवादी मनोरंजन, दैनंदिन लाइव्ह शो, लाइव्हवायर स्टंट्स, राइड्स, गेम्स आणि मुलांसाठी अनेक आकर्षण केंद्र इथे आहेत. इथे प्रत्येक बजेटला अनुरूप स्टुडिओ टूर, इको टूर, फूड, शॉपिंग आणि हॉटेल्स ऑफर आहेत. वर्षभर आयोजित केल्याजाणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये विंटर फेस्ट, न्यू इयर सेलिब्रेशन, हॉलिडे कार्निव्हल, फेस्टिव्ह सेलिब्रेशन-दसरा ते दिवाळी इत्यादींचा समावेश इथे होतो. सिनेमा-जादूची भूमी असल्याने कौटुंबिक सुट्ट्या मजेत घालवण्यासाठी, तसेच भव्य विवाहसोहळ्यांसाठी हे एक उत्कृष्ट गंतव्यस्थान आहे. हनीमून, अनुभवात्मक कॉर्पोरेट कार्यक्रम, शाळा आणि कॉलेज सहल, उत्सव, साहस आणि निरोगीपणा यासाठी सर्व स्तरावर ही फिल्मसिटी उपलब्ध आहे.