महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ramesh Bais Maharashtra Governor : महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती, जाणून घ्या त्यांच्याविषयी - रमेश बैस झारखंडचे 10 वे राज्यपाल

रमेश बैस यांची 23वे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणनू नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच ते राज्यपाल पदाचा पदभार स्विकारतील.

Ramesh Bais Maharashtra Governor
रमेश बैस

By

Published : Feb 12, 2023, 10:14 AM IST

Updated : Feb 12, 2023, 12:02 PM IST

मुंबई :रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजकारणाचा त्यांनी तगडा अनुभव आहे. सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापूर्वी, भारताच्या 16 व्या लोकसभेत ते छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी छत्तीसगडच्या रायपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्यावतीने निवडणूक लढली होती. छत्तीसगड राज्यातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळक आहे. सलग 7 वेळा विजयी राहून ते खासदार राहिले आहेत.

वैयक्तिक जीवन :रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1948 रोजी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये झाला. आधी ते मध्य प्रदेशमध्ये होते. खोम लाल बैस त्यांच्या वडीलांचे नाव आहे. त्यांनी बीएसई, भोपाळ येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 23 मे 1969 रोजी रामबाई बैस यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. बैस हे व्यवसायाने शेतकरी आहेत. 2021 पासून झारखंडचे 10 वे राज्यपाल म्हणूनरमेश बैस यांनी काम पाहिले आहे. त्यांनी जुलै 2019 ते जुलै 2021 मध्ये त्रिपुराचे 18 वे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी 1999 पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम केले होते. रायपूरमधून रमेश बैस 9व्या (1989) आणि 11व्या ते 16व्या (1996-2019) लोकसभा निवडणूकीसाठी निवडून आले होते. खेळ, शेती क्षेत्रात विशेष आवड: रमेश भाई यांची आपल्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच खेळ आणि शेती विषयक क्षेत्राकडे आवड असलेली पाहायला मिळाली आहे. छत्तीसगड आर्चरी ओलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते. 1992 मध्ये मध्य प्रदेश सिंड अँड फार्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ते अध्यक्ष होते.

राजकीय कारकीर्द : रमेश बैस 1978 मध्ये रायपूरच्या नगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले. त्यांनी 1980 ची विधानसभा निवडणूक मंदिर हसद मतदारसंघातून जिंकली. परंतु 1985 ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी सत्यनारायण शर्मा यांच्याकडून हरली. 1989 मध्ये रायपूरमधून 9व्या लोकसभेचे सदस्य म्हणून ते पहिल्यांदा भारतीय संसदेत निवडून आले. 1996 ते 11व्या, 12व्या, 13व्या, 14व्या, 15व्या आणि 16व्या लोकसभेपर्यंत सलग पुन्हा निवडून आले. त्यांनी पोलाद, खाण, रसायने आणि खते, माहिती आणि प्रसारण आणि खाण आणि पर्यावर, वन राज्यमंत्री यांसारख्या विविध खाती सांभाळली आहेत. वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मे 2004 पर्यंत काम केले आहे. जुलै 2019 ते जुलै 2021 या कालावधीत कप्तान सिंग सोलंकी यांच्यानंतर त्रिपुराचे 18 वे राज्यपाल म्हणून काम केले. 1980 ते 1984 साली ते अविभाजित महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य होते.

राष्ट्रपतींकडून अधिसूचना जारी :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची अधिसूचना राष्ट्रपतींनी जारी केली आहे. यामध्ये राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना बिहारचे नवे महामहिम राज्यपाल बनवण्यात आले आहे. तर विद्यमान राज्यपाल फागू चौहान यांची नियुक्ती मेघालयला करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि लडाखचे एलजी राधाकृष्ण माथूर यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. रमेश बैस हे आतापर्यंत झारखंडचे राज्यपाल होते. त्याचवेळी गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.

हेही वाचा :Maharashtra Governor : राष्ट्रपतींनी स्वीकारला कोश्यारींचा राजीनामा; रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

Last Updated : Feb 12, 2023, 12:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details