मुंबई :रामदेव बाबायांनी तीन दिवसांपूर्वी एका योगाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांविषयी अपशब्द काढल्यामुळे नवा वाद उभा झालेला आहे. हे अपशब्द काढत असताना अमृता फडणवीस देखील त्या मंचावर होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी अमृता फडणवीस आणि रामदेव बाबा यांच्यावर टीका देखील केलेली होती. तसेच रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची केली आहे. तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात केलेल्या अपशब्द विधानाबाबत खुलासा करावा म्हणून त्यांना नोटीस पाठवली (notice of the Commission for Women) होती. रामदेव बाबा यांनी माफीनामा राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द केला (Ramdev Baba apologized) आहे.
माफीपत्र राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द :बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत, बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी मुदत दिली गेली होती. त्या मुदतीच्या आत रामदेव बाबा उर्फ राम किसन यादव यांनी महिलांच्या संदर्भात केलेला विधानाबाबत माफीपत्र राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द केले (Commission for Women) आहे.
काय आहे पत्रात : महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 अन्वये आरोप केल्यानुसार कोणताही गुन्हा केलेला नाही. महिलांना समाजात समान दर्जा मिळावा, यासाठी अधोस्वाक्षरींनी नेहमीच जागतिक स्तरावर महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, यासारख्या भारत सरकारच्या विविध धोरणांचा आणि योजनांचा अधोस्वाक्षरींनी नेहमीच प्रचार केला आहे. भारतातील महिलांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी विविध संस्थांसोबत जवळून काम केले आहे. कोणत्याही महिलांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. ठाणे महाराष्ट्र येथे आयोजित केलेला संपूर्ण कार्यक्रम महिला सक्षमीकरणाशी संबंधित होता. कार्यक्रमाची काही सेकंदांची क्लिप ठळक करून सोशल मीडियावर प्रसारित केली जाते आहे. ते माझे शब्द आहेत पण चुकीचा अर्थ दिला जात आहे. मी नेहमीच माता आणि मातृशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीर आहे. माझ्या बोलण्याने दुखावलेल्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो. असे पत्रात नमूद केले गेले आहे.