मुंबई- उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडून पुन्हा भाजपसोबत यावे, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीत 'गो महाविकास आघाडी गो', असे म्हणाले.
महाविकास आघाडी 'गो' - भूकंप
ज्या पद्धतीने मध्यप्रदेशात राजकीय भूकंप झाला. त्याप्रमाणे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याचे म्हणाले.
![महाविकास आघाडी 'गो' केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6381401-thumbnail-3x2-mum.jpg)
शरद पवार जरी म्हणत असले की, राजकीय भूकंप होत नाही. पण, मध्य प्रदेशमध्ये ज्याप्रकारे राजकीय भूकंप आला, त्या पद्धतीने महाराष्ट्रातही राजकीय भूकंप येणार असल्याचे म्हणत हा भूकंप व्हाया राजस्थान येण्याची शक्यता असल्याचे आठवले म्हणाले. ज्या पद्धतीने ज्योतीरादित्य सिधींयांनी भाजपला साथ दिली, त्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत यावे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपने सुचविलेल्या राज्यसभेसाठीच्या नावाबद्दल भाजपचे आभार मानले.
हेही वाचा -राज्यसभा निवडणूक: उदयनराजेंसह रामदास आठवलेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज