महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'...अजूनही वेळ गेली नाही, सक्षम सरकारसाठी भाजप-शिवसेनेने एकत्र यावं' - Ramdas athawale on Bjp-Shivsena alliance

राज्यात सक्षम सरकार देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र यावे, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

Ramdas athawale comment on Bjp-Shivsena alliance
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By

Published : Feb 29, 2020, 9:23 AM IST

Updated : Feb 29, 2020, 12:34 PM IST

मुंबई - अजूनही वेळ गेलेली नसून, राज्यात सक्षम सरकार देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र यावे, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. बिघाडीचे सरकार चालवण्यापेक्षा सक्षम पर्याय म्हणून दोन्ही पक्षाने पुढं यावं असे आवाहन त्यांनी केले. विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा पुनरुच्चार केला.

सक्षम सरकारसाठी भाजप-शिवसेनेने एकत्र यावं

मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुढे करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला अडचणीत आणत आहे. यातून सेनेने बोध घ्यावा. भाजपचे जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी हे सरकार 11 दिवसात पडेल असा दावा केला होता. याबाबत त्यांना विचारणा केली असता, आठवले म्हणाले की, 11 दिवसात सरकार काही पडले नाही, पण पुढे किती दिवस चालेल हे ही सध्या सांगता येणार नाही.

Last Updated : Feb 29, 2020, 12:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details