मुंबई- डोंगरी हा जुन्या मुंबईचा अविभाज्य भाग असून धोकायदायक इमारतीपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने जुन्या मुंबईची नवी मुंबई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी केली. तसेच दुर्घटनाग्रस्त इमारतीला कारणीभुत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आठवलेंनी केली. दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीला भेट दिल्यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
'जुन्या मुंबईची नवी मुंबई करा', रामदास आठवलेंची दुर्घटनाग्रस्त 'केसरबाई' इमारतीला भेट - रामदास आठवले
दुर्घटनाग्रस्त इमारतीला कारणीभुत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आठवलेंनी केली.
यावेळी आठवले म्हणाले, या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू आणि ९ जण जखमी झाले आहेत. म्हाडा आणि महानगरपालिका, असा वाद न करता दुर्घटनेला जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. डोंगरी हा जुन्या मुंबईचा अविभाज्य भाग असून धोकायदायक इमारतीपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने जुन्या मुंबईची नवी मुंबई करावी, त्यासाठी धोरण निश्चित करावे, अशी मागणी आठवलेंनी केली.
डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीला आठवलेंनी सर्वात शेवटी भेट दिल्यानंतर या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी एनडीआरएफ आणि मनपाचे ढिगारा उपसण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.