मुंबई- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे दरवर्षी वन्य प्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सलग तिसऱ्या वर्षी भीम नावाच्या बिबट्याला दत्तक घेतले आहे. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया आज बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली आहे.
एका पँथरने दुसऱ्या पँथरला घेतले दत्तक; सलग तिसऱ्या वर्षी रामदास आठवलेंनी घेतले भीम पँथरला दत्तक - मुलगा जीत
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे दरवर्षी वन्य प्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सलग तिसऱ्या वर्षी भीम नावाच्या बिबट्याला दत्तक घेतले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन वर्षांपूर्वी वन्यप्राणी दत्तक योजनेत आठवले यांनी एक बिबट्या दत्तक घेतला होता. त्याचे नाव भीम ठेवण्यात आले होते. त्यानंतर सलग तिसऱ्या वर्षीही याच भीम पँथरला आज आठवलेंनी दत्तक घेतले आहे. या कार्यक्रमाला आठवले यांची पत्नी, मुलगा जीत व मोठया संख्येने रिपाइचे कार्यकर्ते उपस्थित होते.
झाडे वाढविली पाहिजे व ती जगविली पाहिजे. मोदींचे सरकार हे पर्यावरणाला महत्त्व देणार सरकार आहे. प्राण्यांवर प्रेम केले तर प्राणी आपल्यावर प्रेम करतात. आज एका पँथरने दुसऱया पँथरला दत्तक घेतले आहे. कारण मी पँथर पार्टीचा कार्यकरता आहे. बिबटे कोणावरही अन्याय करित नाही. त्यांच्यावर अन्याय झाल्यास ते इतरांवर अन्याय करतात, असे आठवलेंनी म्हटले आहे. यावेळेस भीम पँथरला त्याच्या नवव्या वाढदिवसानिमित्त आठवलेंनी शुभेच्छाही दिल्या आहेत.