महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे - शरद पवार

राज्यात निर्माण झालेल्या पेचासंदर्भात ज्येष्ठ नेत्याकडून सल्ला घेण्यासाठी रामदास आठवलेंनी शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी भेटीनंतर शरद पवार माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार

By

Published : Nov 8, 2019, 4:31 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने शिवसेना आणि भाजपला बहुमताने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करून स्थिर सरकार स्थापन करावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युतीला दिला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बसणार असल्याच्या भूमिकेवर पवार ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष

हेही वाचा - योग्यवेळी घेणार निर्यण, उद्धव ठाकरेंना सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार - एकनाथ शिंदे

राज्यात निर्माण झालेल्या पेचासंदर्भात ज्येष्ठ नेत्याकडून सल्ला घेण्यासाठी रामदास आठवलेंनी शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी भेटीनंतर शरद पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी पवारांनी भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन करावे' असे सांगितले.

हेही वाचा -सेनाभवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून जिल्हाध्यक्षांना शेतकरी मदतीचे आदेश

राज्यातील परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून सल्ला घ्यायला आठवले माझ्याकडे आले होते. मात्र, जनादेश शिवसेना-भाजप युतीच्या पारड्यात आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावे. आठवलेंनी मत मांडले तर ते सगळेच गांभीर्यानं घेतात, असेही पवार यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details