मुंबई - मराठी साहित्यक्षेत्रात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचा कोहिनूर हरपला आहे, अशा शब्दात सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने रंगभूमीचा कोहिनूर हरपला - रामदास आठवले
मतकरी यांच्या साहित्य कृतीने मराठी साहित्य क्षेत्र समृद्ध झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि रंगभूमीचे कधीही भरून येणार नाही, असे नुकसान झाले आहे अशी शोकभावना आठवले यांनी व्यक्त केली आहे.
रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने रंगभूमीचा कोहिनूर हरपला - रामदास आठवले
रत्नाकर मतकरी मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक होते. त्याचबरोबर श्रेष्ठ नाटककार होते. त्यांनी मराठी साहित्य सोबत मराठी रंगभूमीची सेवा केली. त्यांनी लहान मुलांसाठी विपल लेखन केले एकांकिका नाटके लिहिली. त्यांच्या साहित्य कृतीने मराठी साहित्य क्षेत्र समृद्ध झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि रंगभूमीचे कधीही भरून येणार नाही, असे नुकसान झाले आहे अशी शोकभावना आठवले यांनी व्यक्त केली आहे.