मुंबई - कुर्ला जिल्हा बजरंग दल आणि सर्वोदय मंडळ बैलबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने बैलबाजार परिसरात रामनवमीनिमित्त पालखी काढण्यात आली. या पालखीला भाजपचे मुंबई उत्तर मध्यचे उमेदवार पूनम महाजन यांनी खांदा दिला. जय श्री रामाच्या घोषणेत सर्वोदय मित्र मंडळापासून या पालखीला सुरुवात झाली.
पूनम महाजनांनी रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या श्रीरामाच्या पालखीला दिला खांदा - पूनम महाजन
कुर्ला जिल्हा बजरंग दल आणि सर्वोदय मंडळ बैलबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने बैलबाजार परिसरात रामनवमीनिमित्त पालखी काढण्यात आली. या पालखीला भाजपचे मुंबई उत्तर मध्यचे उमेदवार पूनम महाजन यांनी खांदा दिला.
कुर्ला बैल बाजार परिसरात मागील १५ वर्षांपासून राम नावमीनिमित्ताने रामाच्या पालखीचे आयोजन केले जाते. मात्र, ही पालखी राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. आज (रविवारी) या पालखीची सुरुवात पूनम महाजन यांनी खांदा दिल्यानंतर झाली. यंदा या पालखीत सामाजिक संदेश देण्यासाठी पालखीसमोर प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेसोबतच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, आदी महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.
मागील काही वर्षांपासून बलात्कार आणि इतर काही प्रकरणामुळे कारागृहात असलेल्या आसाराम बापू यांचा एक मोठा वर्ग, त्यांचे भजनीमंडळ, आणि आसाराम बापू यांच्या भव्य प्रतिमा आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करणारी वाहनेही या पालखीसोबत होती. पुलावामामध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि राम मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी बांधण्यासाठी संदेश देत असल्याचे, या पालखीचे आयोजक व बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख संजीव झा यांनी यावेळी सांगितले.