मुंबई:एअरबस (tata airbus project) आणि वेदांता फॉक्सकॉन (vedanta foxconn) वर खोटं बोलणाऱ्या सर्वच प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी केली आहे. (Narco test of opposition leaders). हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाण्यास विरोधी पक्षच कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Ram Kadam: खोटं बोलणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करा - राम कदम - एअरबस
एअरबस (tata airbus project) आणि वेदांता फॉक्सकॉन (vedanta foxconn) वर खोटं बोलणाऱ्या सर्वच प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी केली आहे. (Narco test of opposition leaders)
काय म्हणाले राम कदम? : आपल्या व्हिडिओ द्वारे राम कदम म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा फायनल करून सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले? त्यांच्या कडून कोणी आणि किती टक्केवारी कमिशन मागितले? बारवाल्यांकडून आणि हॉटेल मालकांकडून वसुली करण्यासाठी जे सरकार वाजेसारखे अधिकारी नेमतात ते सरकार अशा मोठ्या प्रकल्पांना फुकट सोडणार आहे का?, असेही राम कदम म्हणाले.
मागील सरकारला केवळ वसूलीत रस:विरोधी पक्षांवर टीका करताना राम कदम म्हणतात, कोणत्या पंचतारांकित हॉटेल मध्ये मीटिंग झाली? मीटिंगला कोण कोण उपस्थित होते? वेदांताने जागा फायनल करून सुद्धा त्यांच्या सोबत MOU का केला नाही? कंपनीच्या प्रमुख लोकांना भेटण्यास टाळाटाळ का? आणि ही टाळाटाळ कोणाच्या सांगण्यावरून केली? नेमके हेच कारण एअरबसच्या बाबतीत सुद्धा आहे का? तत्कालीन सरकारला केवळ कमिशनमध्ये आणि वसुलीत रस होता का त्यामुळेच हे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत का? यासाठी सर्वच विरोधी पक्ष नेत्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही कदम यांनी केली आहे.