मुंबई- राज्यात सरकार स्थापन होऊन 11 दिवस उलटले तरीही खातेवाटप करायला नक्की कोणती भीती वाटते? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारने खाते वाटप केले आणि त्याने एखाद्या नेत्याचं समाधान झाले नाही, तर तो मोठा गट निघून जाईल अशी भीती त्यांना वाटते का? अशी शंका राम कदम यांनी उपस्थित केली.
महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आशा तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, आजही हे 6 मंत्री बिन खात्याचे मंत्री म्हणून काम पाहताहेत. दुसरीकडे येत्या 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते आहे. महाविकास आघाडी सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यातही हे मंत्री बिनखात्याचे राहणार की काय? अशी शंका कायम आहे.
हेही वाचा - 'एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत'