महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 2, 2019, 4:30 PM IST

Updated : Nov 2, 2019, 5:04 PM IST

ETV Bharat / state

राष्ट्रपती राजवट ही संविधानातील कायदेशीर प्रक्रिया - आमदार राम कदम

संविधानातील कायदेशीर प्रक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली त्यात काय गैर आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी केले आहे.

आमदार राम कदम

मुंबई- संविधानातील कायदेशीर प्रक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली त्यात काय गैर आहे. राष्ट्रपती राजवट ही धमकी आहे, असे म्हणणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे आहे, असा टोला भाजपचे प्रवक्ते घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.

बोलताना राम कदम

राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून 9 दिवस झाले आहेत. तरीही राज्यातील सत्तास्थापनेचे नाट्य काय संपता संपत नाही. यातच भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याचे वक्तव्य केले होते. यावर शिवसेनेचे नेते नाराज असून राष्ट्रपती राजवटीची भीती शिवसेनेला तरी भाजपने देऊ नये असाच सध्या शिवसेनेकडून सूर असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे आणि पुन्हा एकदा महायुतीचा सरकार येईल, असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - संजय राऊत यांनी युती तोडण्यापेक्षा जोडण्यावर भर द्यावा, रामदास आठवलेंचा सल्ला

Last Updated : Nov 2, 2019, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details