महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारावीत डॉक्टर्स व स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून महिलांनी साजरा केले रक्षाबंधन - धारावी भाजप रक्षाबंधन कार्यक्रम

आज रक्षाबंधननिमित्त धारावीतील महिलांनी व भाजप पदाधिकाऱ्यांनी धारावीतील नाईंटी फिट रोड परिसरात डॉक्टर्स आणि सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.

rakshabandhan festival celebrated in dharavi
डॉक्टर्स व स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधत धारावीत महिलांनी साजरा केला रक्षाबंधन

By

Published : Aug 3, 2020, 5:41 PM IST

मुंबई - कोरोना काळात धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण झाले होते. हळूहळू कोरोनाचे हे संक्रमण कमी झाले आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर्स आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधननिमित्त धारावीतील महिलांनी व भाजप पदाधिकाऱ्यांनी राखी बांधत सण साजरा केला.

भावा-बहिणीच्या नात्यातील पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन. यानिमित्ताने धारावीतील नाईंटी फिट रोड परिसरात डॉक्टर्स आणि सफाई कर्मचाऱ्यांना धारावीतील महिलांनी राखी बांधत, रक्षाबंधन सण साजरा केला. गेल्या साडे तीन महिन्यापासून डॉक्टर आणि स्वच्छता कर्मचारी या परिसरात अहोरात्र मेहनत करत आहे. सण उत्सवाच्या दिवशीही ते आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य पार पाडत आहे. कोरोनामुळे डॉक्टर व स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपल्या बहिणीला रक्षाबंधनाला भेटण्यासाठी जाता येणार नाही त्यामुळे महिलांनी या कोरोना योद्धाना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

हेही वाचा- रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल - अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details