Mamata Rakhi To Amitabh Bachchan : रक्षाबंधनासाठी ममता बॅनर्जी अमिताभ बच्चन यांच्या घरी - Celebrate Rakshabandhan
इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबई आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राखी बांधण्यासाठी (Rakshabandhan 2023) अमिताभ बच्चन यांच्या घरी पोहोचल्या आहेत. त्यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताब बच्चन यांना राखी बांधली आहे. तसंच त्यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील राखी बांधली आहे. (Mamata Rakhi To Uddhav Thackeray)
ममता बॅनर्जींंनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली
Published : Aug 30, 2023, 7:03 PM IST
|Updated : Aug 30, 2023, 11:02 PM IST
मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबई आलेल्या ममता बॅनर्जी राखी बांधण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या घरी पोहोचल्या आहेत. त्यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताब बच्चन यांना राखी बांधली आहे. त्यानंतर त्या म्हणाल्या की, "मी आज खूप आनंदी आहे. मी आज बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसंच त्यांना रक्षाबंधनानिमित्त राखी देखील बांधली. मला बच्चन कुटुंब प्रचंड आवडतं. हे कुटुंब भारतातील प्रथम क्रमांकाचं कुटुंब आहे. मी अमिताभ बच्चन यांना दुर्गापूजा, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Rakshabandhan 2023) (Mamata Banerjee tied rakhi to Amitabh Bachchan)
महानायकाला बांधली राखी : देशभरात रक्षाबंधन सण साजरा होत आहे. राखी हे भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. या प्रसंगी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. तसंच त्यांच्याकडून सदैव रक्षण करण्याचं वचन घेतात. देशभरातील सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. (Mamata Rakhi To Amitabh Bachchan) अशात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राखी बांधण्यासाठी महानायक अमिताब बच्चन यांच्या घरी पोहचल्या आहेत. तिथं त्यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला आहे. तसंच त्यांनी मातोश्री निवासस्थानी भेट देत रक्षाबंधननिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधलीय.
हेही वाचा -
Last Updated : Aug 30, 2023, 11:02 PM IST