मुंबई: अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आणि शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असून चित्रपट निर्माता साजिद खानविरोधात (Sajid Khan) पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाची शर्लिनने तक्रार दाखल केली. त्यानंतर राखीने साजिदचे समर्थन केले आणि वादात उडी घेतली. संतापलेल्या शर्लिनने राखी सावंतविरोधात गलिच्छ भाषेत वक्तव्य करून गुन्हा दाखल केला. त्यांनतर राखीने ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) वकील फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांच्यामार्फत शर्लिनविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली. दरम्यान काही डिजिटल माध्यमांवर राखी सावंतने तिचा नवा बॉयफ्रेंड आदिलविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर संतापलेल्या राखीने आज ओशिवरा पोलीस ठाण्यातच्या वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली आणि हे वृत्त सर्रास खोटे असल्याचे सांगितले. (Rakhi Sawant warning).
Rakhi Sawant : माझ्या आणि आदिलच्यामध्ये कोणी आलं तर सोडणार नाही, राखी सावंतने दिली वॉर्निंग - शर्लिनविरोधात मानहानीची तक्रार
राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणाली, "मी वॉर्निंग देत आहे. माझ्या आणि आदिलच्यामध्ये कोण आलं तर मी सोडणार नाही. कोणी एका रिपोर्टरने माझ्या आणि आदिलबाबत चुकीची बातमी छापली". त्या बातमीत ओशिवरा पोलीस स्टेशनच्या (Oshiwara Police Station) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिल्याचे नमूद केले आहे.
काय म्हणाली राखी सावंत? : राखी सावंत म्हणाली, 'मी वॉर्निंग देत आहे. माझ्या आणि आदिलच्यामध्ये कोण आलं तर मी सोडणार नाही. लोकं माझ्या आणि आदिलविरोधात खोट्या बातम्या छापत आहेत. कोणी एका रिपोर्टरने माझ्या आणि आदिलबाबत चुकीची बातमी छापली. त्या बातमीत ओशिवरा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिल्याचे नमूद केले आहे. मात्र मी आज सकाळी ओशिवराच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटली आणि याबाबत विचारले असता त्यांनी अशा प्रकारची माहिती दिली नसल्याचे सांगितले. मी तक्रार केली आहे, पण ती शर्लिन चोप्रा विरोधात केली आहे. अशी प्रतिक्रिया अभिनेत्री राखी सावंत हिने दिली आहे.
काय आहे प्रकरण? : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा आज आंबोली पोलीस ठाण्यात पोहोचली. शर्लिन चोप्राने आंबोली पोलीस ठाण्यात राखी सावंतविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तीने राखी सावंतवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्लिन चोप्राने राखी सावंतवर चित्रपट दिग्दर्शक साजिद खानला सपोर्ट केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी राखी सावंतने शर्लिन चोप्रावर मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. शर्लिन चोप्राने उद्योगपती राज कुंद्रा आणि चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचवेळी राखी सावंत या दोघांचा कथित बचाव करताना दिसली आहे. त्याने शर्लिनवर सेक्स्टॉर्शन केल्याचा आरोप केला आहे.