मुंबई:राखी सावंत हिचा नवा वाद (Rakhi Sawant Adil Khan Dispute) आता पुन्हा समोर आलेला आहे. (Rakhi Sawant Vs Adil Khan Defamation Claim) तिचे नवऱ्याशी झालेले वाद जगजाहीर आहेत. नवरा आदिल खान याने आता 200 कोटी रुपयांचा दावा राखी सावंतवर दाखल केलेला आहे. (Defamation Claim against Rakhi Sawant) राखी सावंतने आदिल खान दुराणी याची बदनामी केली, असा आरोप करत त्याने तिच्या विरोधात अंधेरी न्यायालयामध्ये आज दावा दाखल केला. (Adil Khan Defamation Claim)
अंधेरी न्यायालयात खटला दाखल:राखी सावंत हिने पती आदिल खान याच्यावर गंभीर आरोप करत बदनामी केल्याचा शंभर कोटी रुपयांचा दावा नुकताच दाखल केला होता. त्याला काही दिवस उलटले. आता पती आदिल खान दुर्राणी याने राखी सावंत हिने पतीची बदनामी केली. म्हणून 200 कोटी रुपयाचा बदनामीकारक खटला अंधेरी न्यायालयात दाखल केलेला आहे.
राखीने सर्वप्रथम केला होता दावा:आपल्या नवीन दाखल केलेल्या दाव्यामध्ये आदिल खान याने म्हटलेलं आहे की, जेव्हा माझ्यावर खोटे आरोप राखी सावंत करते. शंभर कोटी रुपयांचा बदनामीकारक दावा दाखल करते. तर मला आता नाईलाजाने तिच्या या खोट्या बदनामी करणाऱ्या आरोपामुळेच 200 कोटी रुपयाचा बदनामीकारक खटला दाखल करावा लागत आहे. हे देखील त्याने नमूद केलेले आहे.
Rakhi Sawant Adil Khan Dispute: राखी सावंत विरोधात आदिल खानची न्यायालयात धाव, 'इतक्या' कोटींचा ठोकला मानहानीचा दावा - राखी सावंत विरुद्ध
राखी सावंतचा पती आदिल खान याने राखी सावंतवर त्याची बदनामी (Rakhi Sawant Vs Adil Khan Defamation Claim) केल्याचा दावा करत तिच्या विरुद्ध 200 कोटी रुपयांची मानहानीचा दावा ठोकला आहे. मुंबई अंधेरी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे.
Published : Sep 1, 2023, 9:31 PM IST
यामुळे मानहानिकारक खटला दाखल:याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेले आहे की, दंड प्रक्रिया संहिता 200 या कलमाच्या अंतर्गत अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये राखी सावंत हिने खोटे आरोप केलेले असून ते बदनामीकारक आहेत. त्यामुळे मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. आपल्या दाव्यामध्ये समर्थनार्थ राखी सावंत हिचा पती आदिल खान याने म्हटले आहे, की राखी सावंतने जो माझा छळ केला, जी माझी सार्वजनिक बदनामी केली, तो एकेक क्षण मला माहिती आहे. याच न्यायालयामध्ये मला गुन्हेगार ठरवून काळा बुरखा घालून राखी सावंतच्या तक्रारीनंतर आणण्यात आलं होतं. ही माझी बदनामी आहे. त्यामुळेच मानहानिकारक खटला दाखल केला आहे.
हेही वाचा: